पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१६९) हाता असे दिसते. प्रद्युम्न मंगळाविषयीं भग्न झाला, आणि गुरु आणि शनि यांविषयी विजयनंदी भग्न झाला असें वर दिलेल्या एका आर्येत वराहमिहिरही ह्मणतो. या दोघांच्या करणग्रंथांस पादकरण असें ब्रह्मगुप्त ह्मणतो. पूर्वी (पृ. १५५) दिलेल्यांपैकी एका आर्येतही विजयनंदिकृत पाद श्रीषेणाने घेतले असें ब्रह्मगुप्त ह्मणतो. याचा अर्थ काय तो समजत नाही. पाद ह्मणजे युगपाद की काय नकळे. असो तर यावरून *लाट, सिंह, प्रद्युम्न, विजयनंदी हे ज्योतिषग्रंथकार शके ४२० च्या पूर्वी झाले असे दिसून येतें. सूर्यसिद्धांत, सोमसिद्धांत, वसिष्ठसिद्धांत, रोमशसिद्धांत, आणि शाकल्यसंहितोक्त ब्रह्मसिद्धांत ( वर्तमानकाळचे.) या पांचांपैकी सोमसिद्धांत खेरीज करून बाकी नांवांचे सिद्धांत पंचसिद्धांतिकेंत आले आहेत. परंतु ते आणि आतां ज्यांचा विचार करावयाचा आहे ते हे भिन्न आहेत असें पूर्वी सांगितलेच आहे, आणि पुढे केलेल्या विवेचनावरूनही दिसुन येईल. आतां ज्यांचा विचार करावयाचा ते सांप्रत उपलब्ध आहेत, आणि पंचसिद्धांतिकोक्तांहून भिन्न आहेत. म्हणून त्यांस वर्तमान असें विशेषण लावले आहे. सोमसिद्धांत जरी दोन प्रकारचा होता किंवा आहे असें म्हणण्यास कांहीं स्पष्ट प्रमाण नाही, तरी त्याचे वरील इतर चोहोंशी पूर्णपणे साम्य आहे. म्हणून त्याचाही यांतच विचार करणे बरें. या पांचांविषयीं साधारणतः थोडेंसें विवेचन करून मग प्रत्येकाचे निरनिराळे विवेचन करूं. हे पांचही सिद्धांत अपौरुष आहेत असे त्यांत लिहिलेले आहे व त्याप्रमाणे मा नतातही.हे पांच सिद्धांत, पंचसिद्धांतिकोक्त पांच सिद्धांतांअपरुिष. पैकी कांहीं किंवा सर्व, आणि विष्णुधर्मोत्तरब्रह्मसिद्धांत यांखेरीज दुसरा कोणताही सिद्धांत अपौरुष मानीत नाहीत. पूर्वी यांहून एखादा जास्त मानीत असले तरी सांप्रत तो उपलब्ध नाही. व्याससिद्धांत, गर्गसिद्धांत, नारदसिद्धांत, पराशरसिद्धांत हे अपौरुषच होत. परंतु त्यांस सिद्धांत म्हणण्यापेक्षा संहिता म्हणणे बरें. सिद्धांतांत जे विषय ज्या क्रमाने असतात ते ज्यांत आहेत असा या व्यासादिकांच्या नांवाचा एखादा सिद्धांत सांप्रत उपलब्ध असेलसें वाटत नाहीं. असल्यास माझ्या पहाण्यांत किंवा वाचण्यांत नाहीं. पाराशरसिद्धांतांतली भगणा - दि माने युरोपियन विद्वानांनी दिली आहेत. परंतु ती द्वितीय आर्यसिद्धांतांत एका अध्यायांत पाराशरसिद्धांतांतली म्हणून दिली आहेत. तो स्वतंत्र सिद्धांत उपलब्ध नाही. याविषयीं द्वितीयायसिद्धांतविचारांत जास्त विवेचन होईल. विष्णुधर्मोतरब्रह्मसिद्धांताविषयीं पुढें थोडेसें विवेचन होईल. पौरुषसिद्धांतांत अतिप्राचीन मटला तर प्रथम आयंसिद्धांत होय. याचा काल शक ४२१ हा आहे. याहून सदरास लिहिलेले पांचही सिद्धांत प्राचीन असतीलच असें नाहीं; तथापि त्यांतला एखादा तरी त्याहून प्राचीन आहे, असे मला वाटते. या सर्वांचे साम्य आहे, आणि हे अपौरुष मानतात, म्हणून पंचसिद्धांतिकाक्त सिद्धांतांच्या विवेचनानंतर प्रथम यांचे विवेचन करणे योग्य आहे.

  • लाट हाच लगध असेल या वेबरच्या शंकेत कांही अर्थ नाहीं असें वरील विवेचनावरून आणि वेदांगज्योतिषांत काय आहे हे पाहिल्यावरून दिसून येईल.