पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बुध रवि (१७०) प्रथम या पांच सिद्धांतांतली भगणादि मानें देतो. ती सर्वांची एकसारखीच आहेत. सूर्यसिद्धांत, सोमसिद्धांत, आणिवासिष्ठ, रोमक व शाकल्योक्त ब्राह्म सिद्धांत यांतील मानें. सृष्टयुत्पत्ति वर्षे १७०६४००० महायुगांत महायुगांत मंगळ २२९६८३२ नक्षत्रभ्रम १५८२२३७८२८ १७९३७०६० रविभगण ४३२०००० गुरु ३६४२२० सावनदिवस १५७७९१७८२८ शुक्र ७०२२३७६ चंद्रभगण ५७७५३३३६ शनि १४६५६८ चंद्र उच्च ४८८२०३ चांद्रमास ५३४३३३३६ चंद्रकेंद्र ५७२६५१३३ चांद्रतिथि १६०३०००००० चंद्रपात २३२२३८ सौरमास ५१८४०००० अधिमास १५९३३३६ क्षयाह २५०८२२५२ कल्पांत. उच्चभगण पातभगण ३८७ मंगळ २०४ २१४ बुध ३६८ ૬૮૮ गुरु १७४ शुक्र ५३५ शनि यांत सृष्टयुत्पत्तिवर्षे १७०६४००० दिली आहेत त्यांविषयी थोडेसें सांगितले 4 पाहिजे. युगपद्धतीचें कांहीं स्वरूप उपोद्घातांत सांगित लेंच आहे. ब्रह्मदिवसाच्या आरंभींच सृष्टि उत्पन्न झाली आणि त्या वेळी म्हणजे कल्पारंभींच सर्व ग्रह, त्यांची उच्चे. आणि पात हे सर्व एकत्र मेषारंभी होते असें ब्रह्मगुप्त आणि त्याचे अनुयायी यांचे मत आहे. सांप्रतचा सूर्यसिद्धांत आणि त्याचे अनुयायी इतर सिद्धांत यांच्या मतें कल्पारंभीच सर्व सृष्टि उत्पन्न झाली नाही, तर सृष्टि उत्पन्न करण्यास ब्रह्मदेवास दिव्य ४७४०० वर्षे म्हणजे कलियुगाएवढी ३९॥ युगे लागली. कल्पारंभापासून इतका काल गेला, तेव्हां सर्व ग्रह, त्यांची उच्चे, आणि पात, हे सर्व एकत्र होते; पुढे ग्रहगति सुरू झाली. दुसऱ्या आर्यभटाचे बहुतेक असेंच मत आहे. त्याची सृष्टयुत्पत्तिवर्षसंख्या मात्र भिन्न आहे. ती पुढे सांगू. तसेंच पहिल्या आर्यभटाचें मत पुढे सांगू. पंचसिद्धांतिकोक्त सूर्यादि सिद्धांतांचे काय मत होते हे समजण्यास मार्ग नाही. सांप्रतच्या सूर्यसिद्धांताप्रमाणे वर्तमानकलियुगारंभी सर्व ग्रह मध्यममानाने एकत्र येतात. तसेच कृतयुगांतीं सूर्यसिद्धांत झाला तेव्हाही सर्व ग्रह एकत्र होते. महायुगांत ग्रहांचे जे भगण मानले आहेत त्यांची संख्या चोहोंनी विभाज्य आहे. यामुळे (१०४ =)२॥ कलियुगांत पूर्ण भगण होतो. यामुळे २।। कलियुगांइतक्या कालाच्या अंतराने सर्व ग्रह एकत्र येतात. ब्रह्मदिनारंभापासून वर्तमानकलि ६० युगपद्धति