पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पहिल्या अंगाच महत्त्व कमी होत गेले, व सुमारे शके १४५० पासून दुसन्या अंगांचे प्राधान्य झालें; किंबहुना मुहूर्त हेंच प्रकरण पुढे तिसरा स्कंध होऊन बसलें, असें त्या विषयावरील मुहूर्ततत्व, मुहूर्तमार्तड, मुहूर्तचिंतामाण, मुहूर्त चूडामणि, मुहूर्तदीपक, मुहूर्तगणपति, इत्यादि ग्रंथांच्या नांवांवरून व त्यांतील विषयांवरून ह्मणण्यास हरकत नाही. वराहमिहिराच्या बृहत्संहितेतील काही विषय मुहूर्तथांत असतात; परंतु त्यांचे तितकें प्राधान्य नसते. होरास्कंधाचें मूळचे स्वरूप सामान्यतः मटले तर कोणा मनुष्याच्या जन्मकालच्या लग्नावरून त्याच्या जन्मांतील सर्व सुखदुःखादिकांचा विचार अगोदर ठरविणे हे होय. परंतु त्यांत पुढे दोन अंगें झाली. वर लिहिले हे एक अंग. होरास्कंधासच जातक असें नांव प्रथम होते. पुढे त्याच्या ह्या अंगास जातक ह्मणू लागले व दुसरे अंग ताजिक हे झालें. ताजिकाचा मुख्य विषय सामान्यतः मटला झणजे कोणा मनुष्याच्या जन्मापासून सौरमानानें कोणतेही वर्ष पुरे होऊन नवें लागेल त्या क्षणी जे लग्न असेल, त्यावरून त्या वर्षांत त्या व्यक्तीस होणारे सुखदुःख ठरविणे हा होय. त्या विचारांत जन्मलग्नास मुथहा असें नांव ठेवून तो एक ग्रह मानलेला आहे, असें झणण्यास हरकत नाही. ताजिक या शब्दाचें 'तातीयक ' असें संस्कृत रूप कांहीं ग्रंथकारांनी केले आहे. या देशात मुसलमानांचे प्राबल्य झाल्यापासून ह्मणजे सुमारे शके १२०० पासून त्यांच्या ग्रथावरून ताजिक हे अंग आमच्या देशांत आले. या ब्रह्मांडांत पृथ्वी, चंद्र, सूर्य इत्यादिकांची स्थिति कोठे कशी आहे, त्यांस गति कशी प्राप्त होते, ती कोणत्या प्रकारची असते इत्यादि गोष्टींविषयीं सामान्य वर्णन आमच्या ज्योतिषग्रंथांत ज्या प्रकरणांत असते त्यास भुवनसंस्था, जगत्संस्था, भुवनकोश अशा अर्थाचें नांव निरनिराळ्या ग्रंथांत दिलेले आहे. ह्या तीन गोष्टींचे सविस्तर विवेचन पुढे यथास्थली येईलच. तथापि विषयप्रवेश होण्याकरितां भुवनसंस्था, ग्रहगति, अयनचलन आणि कालगणना करावयाची युगपद्धति ह्यांविषयीं सामान्यतः संक्षेपाने काही सांगतों. भवनसंस्था-विश्वाच्या मध्यभागी पृथ्वी आहे; तिच्याभोवती चंद्रादि फिरतात; त्यांचा क्रम चंद्र, बुध, शुक्र, रवि, मंगळ, गुरु, शनि आणि तारकामंडल असा आहे. नक्षत्रमंडल फिरते, त ध्रुवद्वयबद्ध असें फिरते; पृथ्वी गोलं आहे; ती निराधार आहे. तिच्याभोंवतीं वायु आहे; त्यास भूवायु ह्मणतात; त्यावर आकाशांत प्रवहनामक वाय संचार करतो; त्याच्या प्रेरणेने चंद्रादि तेज़ांस गति प्राप्त होते; आणि ती पृथ्वीभोवती फिरतात असें आमच्या ज्योतिःशास्त्राचे मत आहे. त्याबद्दल वर्णन समदांत ग्रंथांत आणि तंत्रांत असतें. करणग्रंथांत हे वर्णन नसते, तरा पंचसिद्धांतिकेत तें आहे. ज्योतिष पौरुषग्रंथांत पंचसिद्धांतिकेंतल्या मतांइतकी प्राचीन मतें दस प्रस्तत उपलब्ध नाहीत. ह्मणून पंचसिद्धांतिकेतील वरील अर्थाची वाक्ये खालीलों पंचमहाभूतमयस्तारागणपंजरे महीगोलः ।। खऽयस्कांतांतःस्था लोहइवावस्थितो वृत्तः ॥ १ ॥ मेरोः समोपरि वियत्यक्षो व्योम्नि स्थितो ध्रुवोऽधोन्यः ॥