पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जशा पूर्णत्वास येत गेली तसतसे प्रत्येक स्कंधाचे निरनिराळे ग्रथं झाले असाव साहता ही संज्ञा एका शाखेस मात्र लावू लागले असावे. वराहमिहिराच्या, सिद्धांतिकेवरून दिसतें की निरनिराळ्या शाखांवर स्वतंत्र ग्रंथ त्याच्यापूर्वी । ४२७ सांपूर्वी) झाले होते. आर्यभटाचा केवळ गणितस्कंधावरचा ग्रंथ वराहा हिराच्या किंचित् पर्वीचा आहे; परंतु त्याच्याही पूर्वी गणितस्कंध स्वतंत्र झाला होता हे सविस्तर पुढे दाखविण्यात येईल. स्वतः वराहमिहिराचे तर तीनही शाखावर निरनिराळे. ग्रंथ आहेत. या प्रत्येक स्कंधाच्या ग्रंथांत सामान्यतः कोणते विषय असतात हे सांगतो. ग णितस्कंधाच्या ग्रंथांत सिद्धांत, तंत्र, करण, असे तीन प्रकार आहेत. करणयथात केवळ ग्रहगणित असतें. सिद्धांताचें लक्षण भास्कराचायीने असें केलें आहे:त्रुट्यादिप्रलयांतकालकलनामानमभेदः वामाचारथ युसदां द्विधाच गणितं प्रश्नास्तथा सोत्तराः । भूधिष्ण्यग्रहसंस्थितेश्च कथनं यंत्रादि यत्रोच्यते सिद्धांतः स उदाहतोऽत्र गणितस्कंधप्रबंधे बधः।५ सिद्धांतशिरोमणि, मध्यमाधिकार. ' सिद्धांत किंवा तंत्र यांत मुख्यत्वें दोन अंगें असतात असें झटले असतां चालेल. एकांत केवळ ग्रहादि गणित असते, आणि दुसन्यांत मुख्यत्वें सृष्टिरचनेचे वर्णन असते; व गोलविचार, यंत्ररचना, कालगणनेची मानें वगैरे विषय असतात. ही दोन अंगे अगदी पृथक नसतात, व तशी करिताही येत नाहीत. दोहोंचे मिश्रणच झालेले बहुतेक सिद्धांतांत आढळतें.. सिद्धांत, तंत्र, करण, यांचे लक्षण,-कल्पापासून ग्रहगणिताचा ज्यांत विचार असतो तो सिद्धांत: महायुगापासून ग्रहगणित ज्यांत असतें तें तंत्र व एकाद्या शकवर्षापासून ग्रहगणित ज्यांत असतें तें करणअसें कोणी करितात. परंतु केवळ ग्रहगणितासंबंधे पाहिले असता त्यांत याखेरीज भेद कांहीं नाहीं. ह्मणजे वस्तुतः भेद नाहीं झटले तरी चालेल. तीनही प्रकारच्या ग्रंथांत ग्रहगणिताचा विचार ज्या निरनिराळ्या प्रकरणांत केला असतो त्यांस अधिकार किंवा अध्याय ह्मणतात. ते अधिकार सामान्यतः हे असतातः १ मध्यमाधिकारश्चं द्रग्रहण ७ उदयास्त १० भग्रहयुति २ स्पष्टाधिकार ५ सूर्यग्रहण ८ शृंगोन्नति महापात . ३ त्रिप्रश्नाधिकार . ६ छायाधिकार . ९ ग्रहयुति सर्व ग्रंथांत इतकेच अधिकार असतात असें नाहीं कमजास्तही असतात व त्यांचा क्रमही निरनिराळ्या ग्रंथांत निरनिराळा असतो. तरी त्या सर्वांचा समावेश वरील अकरांमध्ये होईल. संहिता या स्कंधामध्ये कोणकोणते विषय येतात याविषयी सर्वांची एकवा-- क्यता नाही. सामान्यतः ह्मटले तर ग्रहचार मणजे नक्षत्रमंडलांत यहांचें. गमन व त्यांची परस्परांची युद्धे इत्यादि; तसेच धूमकेतु, उल्कापात, ग्रहणे इत्यादिक व शकुनादिक यावरून जगताला शुभाशुभाची फलें कशी होतील हा विचार, हे एक: व मुहूर्तविचार झणजे यात्रा, विवाह इत्यादि कृत्ये कोणत्या मुहूर्तावर केली असतां शुभाशुभ फलप्रद होतात याविषयी विचार हे एक; अशी सहितेची दोन अंगें मटली असतां चालेल. वराहमिहिराच्या संथावरून दिसते की दोनही अंगांचे महत्व त्याच्या वेळी सारखे होते. परंतु श्रीपतीच्या काळापासून ह्मणजे शके ९६० पासून