पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तत्र निबद्धो मरुता प्रवण भ्राम्यते भगणः ॥ ५ ॥ चंद्रादूर्व बुधसितरविकुजजीवार्कजास्ततो भानि ॥ ३९॥ अध्याय १३ त्रैलोक्यसंस्थान. ग्रहांसह सर्व तारकामंडल सुमारे एक दिवसांत पृथ्वीभोंवतीं एक प्रदक्षिणा करते असे दिसते. परंतु ही दैनंदिन गति वास्तविक नाही, पृथ्वीच्या दैनंदिन गतीमुळे ती भासते, असें जें आधुनिक मत त्याप्रमाणे आपल्या ज्योतिषांपैकी पहिल्या आर्यभटाचे मात्र मत आहे. इतर सर्वांचे मत नक्षत्रमंडलाची दैनंदिन गति वास्तविक आहे असे आहे. आणि बहुतेक पौरुष सिद्धांतकारांनी आर्यभटाच्या मतास दोष दिला आहे. नक्षत्रांच्या संबंधे पाहिले असतां ग्रह पश्चिमेकडून पूर्वेस जातात असे दिसते. आणि मुख्यतः ग्रहांच्या याच गतीचा ज्योतिःशास्त्रांत विचार करावयाचा. ग्रहांच्या पूर्वाभिमुख गतीची उपपत्ति सूर्यसिद्धांतांत अशी आहेपाट् व्रजंतोतिजवानक्षत्रैः सततं ग्रहाः ॥ जीयमानास्तु लंबते तुल्यमेव स्वमार्गगाः ॥२५॥ मध्यमाधिकार. अर्थ-नक्षत्रांसहवर्तमान ग्रह पश्चिमेस जात असतां नक्षत्रांनी अति वेगाने त्यांस जिंकल्यामुळे ते आपल्या मार्गात सारख्या प्रमाणाने मागे राहतात. ह्मणून त्यांस पूर्वेकडची गति प्राप्त होते. याचे तात्पर्य इतकेंच की ग्रहांची दैनंदिन गति नक्षत्रांहून कमी असल्यामळे ते मागे राहतात. यामुळे नक्षत्रांच्या संबंधे पाहिले असतां ते पूर्वेस जातात असे दिसतें... पहिल्या आर्यभटाने नक्षत्रांची दैनंदिन गति वास्तविक नाही असे मानलें असल्यामुळे त्यास ग्रहांच्या प्राग्गतीबद्दल वर लिहिल्या प्रकारची कल्पना करावी लागली नाही. त्याने ग्रहांस वास्तविकच पूर्वाभिमुख गति आहे असे मानले आहे. ग्रहगतीविषयी आणखी एक अशी कल्पना केलेली आहे की सर्व ग्रहांची पर्वगति त्यांच्या त्यांच्या कक्षामंडलांत सारखीच आहे. परंतु ग्रहांची अंतरें पृथ्वीपासून सारखी नसल्यामुळे जवळच्यांच्या कक्षांपेक्षां दूरच्यांच्या कक्षा मोठ्या आहेत: यामुळे आपल्या प्रत्ययास येणारी त्यांची प्राग्गति भिन्न भिन्न दिसते. चंद्र फार जवळ असल्यामुळे त्याची गति सर्वात जास्त आहे. आणि शनिकक्षा सर्व ग्रहांच्या बाहेर असल्यामुळे शनीची गति सर्वांत मंद आहे. पंचसिद्धांतिकेंत झटले आहेः प्राग्गतयस्तुल्यजवा ग्रहास्तु सर्वे स्वमंडलगाः ॥ ३९ ॥ पति शशी शीघ्रं स्वल्पं नक्षत्रमंडलमधस्थः॥. उर्वस्थस्तुल्यजको विचति महदर्कजो मंदं ॥४१॥ अ० १३ त्रैलोक्यसंस्थान. ग्रहाची सर्व नक्षत्रमंडळांत जी एक प्रदक्षिणा तिला भगण ह्मणतात. भगणास काल किती लागतो हे अनेक प्रदक्षिणांचे काल पाहून त्यावरून ठरविले असले पाहिजे हे उघड आहे. कल्पांत किंवा महायुगांत एकेका ग्रहाचे भगण किती होतात हे गणितग्रंथांत सांगितले असते. या कालावरून निघणारी व वरील पंच