पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग दुसरा ज्योतिःसिद्धांतकालच्या ज्योतिःशास्त्राचा इतिहास. १. गणितस्कंध. (१) मध्यमाधिकार. insan प्रकरण १. ज्योतिषग्रंथांचा इतिहास आणि मध्यमगति इत्यादि. उपोद्घातांत लिहिल्याप्रमाणे ह्या दुसन्या भागांत ज्योतिःसिद्धांतकालांतला ह्मविषयोपक्रम. णजे शकापूर्वी सुमारे ५०० वें वर्ष या कालापासून आज. पर्यंतच्या ज्योतिःशास्त्राचा इतिहास पहावयाचा. त्यांत प्रथम गणितस्कंधाच्या मध्यमाधिकारांतील पहिल्या प्रकरणांत ग्रहगणिताच्या ग्रंथांचा इ. तिहास आणि ग्रहांची मध्यमगतिस्थिति इत्यादिकांचे विवेचन करूं. पहिल्या भागांत वैदिक कालांतलें आणि वेदांगकालांतलें ज्योतिषाचे जे ज्ञान दिसून येते ते त्या कालाच्या मानाने पुष्कळ आहे; परंतु ग्रहांची स्पष्टगतिस्थिति वर्तविणे ह्या स्थितीशी ताडून पहातां तें थोडे आहे. ह्या दोहोंच्या मधल्या कालांतले कांहीं ग्रंथ असले पाहिजेत. काही संहिताग्रंथ त्या प्रकारचे असतील, परंतु ते सांप्रत उपलब्ध नाहीत. असल्यास माझ्या पाहण्यांत नाहीत. ज्योति:सिद्धांतकाल आणि पूर्वीचा काल यांतील ज्योतिषज्ञानाची सांखळी कांहींशी लावितां येते. तिजविषयी विवेचन पुढे येईल. परंतु स्पष्टगतिस्थिति काढणे या उच्चस्थितीला ज्योतिषज्ञान कसकसे आले, वेध कसे घेतले, निरनिराळे वेध ताडून पाहून त्यांवरून गतिमाने कशी निश्चित केली, ही माहिती लागत नाही. ज्योतिःसिद्धांतग्रंथांत जे प्राचीन आहेत त्यांत तें ज्ञान एकदम बऱ्याच उच्चस्थितीला आलेले दृष्टीस पडते. ते त्या स्थितीला ज्यांनी आणिलें ते पुरुष अलौकिक वाटणे साहजिक आहे आणि यामुळेच, ग्रहगाणताचे अगदी प्राचीन ग्रंथ जे उपलब्ध आहेत ते अपौरुष अशी जी समजूत आहे, ती झालेली आहे हे उघड आहे. ते ग्रंथ अलौकिक मानिल्यामुळे त्यांत वेधादिकांचे वर्णन न येणें साहजिक आहे. ते न येण्याचे दुसरेही एक सबल कारण आहे. त्या वेळची स्थिति पाहिली असतां ग्रंथ जितके संक्षिप्त होतील तितके ध्यानात राहण्यास चांगले, झंणून त्यांत केवळ ग्रहगतीचे सिद्धांत मात्र सांगितले आहेत; ते सिद्धांत कसे उत्पन्न झाले हे सांगून ग्रंथाचा विस्तार केला नाही असे दिसते.