पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५०) मध्यमाधिकार ह्या सदरांत सर्व ग्रहगणितग्रंथांचा विचार कालानुक्रमाने करितों. निरनिराळ्या ग्रंथांतील इतर अधिकारांतल्या गोष्टींचा भेद असल्यास तो किंवा त्यासंबंधे सांगण्यासारख्या विशेष गोष्टी असल्यास त्या पुढे त्या त्या अधिकारांत येतील; बाकी त्या ग्रंथांसंबंधे सर्व गोष्टी या मध्यमाधिकारांतच येतील. कांहीं ग्रंथ अपौरुष मानतात; कांहीं ग्रंथकर्त्यांचे एकाहून जास्त ग्रंथ आहेत; म्हणून सदरास कोठे ग्रंथाचींच नांवें येतील, कोठे ग्रंथकारांची येतील. ज्योतिषगणिताचे अगदी पहिले ज्ञात ग्रंथ मटले ह्मणजे सूर्यसिद्धांतादि पांच सिद्धांत होत. ते अपौरुष मानितात. त्यांत दोन प्रकार आहेत. वराहमिहिराच्या पंचसिद्धांतिकेंत सौरादि पांच सिद्धांत आहेत, ते सांप्रत उपलब्ध नाहीत. पंचसिद्रांतिकेवरून त्यांतील माने समजतात. यांस मी प्राचीन सिद्धांतपंचक ह्मणतों.दुसरे सौरादि पांच सिद्धांत हल्ली उपलब्ध आहेत. त्यांस मी वर्तमानसिद्धांतपंचक गणतों. यांचा आतां विचार करूं. प्रथम प्राचीन सिद्धांतपंचकाचा विचार करितों. हे सिद्धांत शकापूर्वी ५ शतकांतले आहेत. कदाचित त्यांतले एकदोन याहूनही प्राचीन असतील. प्राचीन सिद्धांतपंचक. वराहमिहिराच्या पंचसिद्धांतिकेंत पांच सिद्धांत आहेत ते असे:--- Shas पौलिशरोमकवासिष्ठसौरपैतामहास्तु पंचसिद्धांताः ।। पंचसिद्धांतिकेंत यांतील माने आहेत, त्यांवरून ते सिद्धांत सांप्रतच्या सूर्यादि पांच सिद्धांतांहून भिन्न होते असें सिद्ध होते. ते सांप्रत उपलब्ध नाहीत; इतकेच नव्हे, तर पंचसिद्धांतिकापुस्तकही ह्या प्रांतांत कोठे उपलब्ध नाही व फारसे कोणास माहीतही नाही. काश्मीरांतून डा० बुल्हर यांनी आणलेल्या पंचसिद्धांतिकेच्या २ प्रती डेक्कन कॉलेजांतील सरकारी पुस्तकसंग्रहांत आहेत (सन १८७४/७५ नंबर ३७ व सन १८७९/८० नंबर ३३८). त्या फारच अशुद्ध व अपुन्या आहेत. आणि कोठे कोठे त्यांतील एक आया संपून दुसरी कोठे लागली हेही समजत नाही. त्या प्रतींच्या आधाराने मी एक प्रत करून घेतली आहे. तीवरून गणित करितां असें दिसून आले की, त्यांतले सूर्यादि सिद्धांत सांप्रतच्या सिद्धांतांहून भिन्न आहेत. ह्मणजे मुख्यतः त्यांतील वर्षमान आणि ग्रहगतिमान ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत. सांप्रतच्या सूर्यसिद्धांताहून निराळा सूर्यसिद्धांत पूर्वी होता ही गोष्ट गेल्या ८०० वपति ह्या देशांत कोणास माहीत होती असें ह्या काळांतल्या ज्योतिषग्रंथांवरून दिसत नाही. इ. स. १८८७ मध्ये मला ती समजली व ती गणिताने व प्रमाणांतरांनी सिद्ध होत आहे तेव्हां तिच्याविषयी संशय मुळीच नाही. पंचसिद्धांतिकापुस्तक फारच अशुद्ध असल्यामुळे व त्यावर टीका नसल्यामुळे पुष्कळ भागाचा अर्थ लागत नाही. तरी बन्याच महत्त्वाच्या गोष्टी समजल्या आहेत.* त्यांवरून संक्षेपतः पंचसिद्धांतांचे वर्णन, त्यांचा जो काल मला वाटतो, त्याच्या अनुक्रमाने करितों.

  • डेक्कन कॉलेजांतील प्रतीवरून पंचसिद्धांतिकाग्रंथ डा०थिबी यांनी १८८९ मध्ये छापलाआहे. त्यांत त्यावर नवीन टीका सुधाकर द्विवेदी यांनी केली आहे. तो सर्व पाहण्यास मला अयापि वेळ झाला नाही. तरी पंचसिद्धांतिकेतील महत्त्वाच्या गोष्टी मीच काढिलेल्या वर सर्व आल्या आहेत.