पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुळे नक्षत्रांची क्रांति म्हणजे विषुववृत्तसंबंधे स्थान नेहमी बदलत असते. परंतु स्वाती, श्रवण, धनिष्ठा, उत्तराभाद्रपदा यांचा शर २४ अंशांहून जास्त उत्तर आहे, म्हणून ही नक्षत्रे कधींच विषुववृत्ताच्या दक्षिणेस यावयाची नाहीत.* म्हणून कोणतीच लगत १३ नक्षत्रे विषुववृत्ताच्या एकाच बाजूस कधींच यावयाची नाहीत. पृथ्वीवरील कोणतेही स्थान घेतले आणि तेथे राहणारा आकाशांत पाहूं लागला, तर त्याच्या एका दिशेकडून अर्धी नक्षत्रे जातील आणि दुसरेकडून अर्धी जातील असें कोठेच व्हावयाचें नाही. म्हणून वरील वेदवाक्यांत "दक्षिणेन परियति " याचा अर्थ अमक्याच्या दक्षिणेकडून असा संभवत नाही. कृत्तिकादि देवनक्षत्रे दक्षिणेकडून उत्तरेस फिरतात असा अर्थ घेतला ह्मणजे त्याचा फलितार्थ ती दक्षिणेकडून उत्तरेकडे आहेत, ह्मणजे सूर्याच्या दक्षिणेकडून उत्तरेस जाण्याच्या मागीत आहेत, असा सहज दिसतो. ह्मणजे अर्थात् कृत्तिकारंभी उदगयन होत असे असें या वाक्यावरून होते. आणि तसें अयन होण्याचा काल इ. स. पूर्वी ८७५० हा येतो. परंतु असा अर्थ करण्यास अडचणी आहेत. कृत्तिका पूर्वेस उगवतात अशा अर्थाचे शतपथब्राह्मणांतलें वाक्य वर दिले आहे; त्यांत कत्तिकांची स्थिति स्पष्ट आहे तशी या वाक्यांत नाही. हा अर्थ खरा मानला तर शतपथ आणि तैत्तिरीय या ब्राह्मणांच्या कालांचे अंतर ६००० वर्षांच्या जवळ जवळ येते, परंतु ते संभवनीय नाही. आणि वेदांगज्योतिषांत धनिष्ठांवर उदगयन आहे, तेव्हां कृत्तिका आणि धनिष्ठा यांमधील ६ नक्षत्रांवर उदगयन झाल्याचे उल्लेख कोठे तरी असावे ते कोणत्याच ग्रंथांत नाहींत. बाकी इतक्या प्राचीनकाली आमच्या लोकांस नक्षत्रज्ञान असणे असंभवनीय नाही हे रोहिणीशकटभेदाच्या विवेचनावरून दिसून येईल. तेव्हां वरील वेदवाक्यांचा काय अर्थ असेल तो असो. वेदवेदांगकालचें ज्योतिःशास्त्राचे ज्ञान एथवर सविस्तर सांगितले. ग्रीक ज्योति षाचा आमच्या ज्योतिषाशी संबंध असेल तर तो या काला नंतरचा आहे. यावरून या भागांत सांगितलेलें ज्ञान स्वतंत्रपणे आमच्या देशांतले आहे. यांतील मुख्यतः ग्रहगतिस्थितसिंबंधे विशेष महत्वाच्या गोष्टी एथे थोडक्यांत सांगतो. बाकी अनेक महत्वाच्या गोष्टी मागें सांगितल्या आहेत तेथे पहाव्या. शकापूर्वी ५ हजार वर्षांच्या पूर्वीच नक्षत्रज्ञान झाले. अधिमास वालण्याची रीति त्याच सुमारास सुरू झाली असावी. मासगणना नेहमी चांद्र होती. ग्रहांचें ज्ञान शकापूर्वी ५ हजार वर्षे झाले होते. म्हणजे त्यांची भविष्यकालची स्थिति वर्तवितां येत होती असे नाही, तर त्यांस गति आहे हे समजून येऊन नक्षत्रसंबंधे त्यांची स्थिति पाहूं लागले होते. मध्वादि माससंज्ञा त्याच सुमारास सुरू झाल्या असाव्या. चैत्रादि संज्ञा शकापूर्वी २ हजार वर्षांच्या सुमारास पडल्या. तोपर्यंत सार.

  • इ. स. पूर्वी २३५०, १४६२ इ. स. ५७० आणि १८८७ ह्या चार काळींची नक्षत्रस्थिति मी काढून पाहिली. त्यांत कोणती तरी लगत १३ नक्षत्रे विषुववृत्ताच्या एकाच बाजूस असे कधीही येत नाही. ते सर्व आंकडे विस्तरभयास्तव एथे देत नाहीं.

याप्रमाणे डाव्या बाजूस बारीक अक्षरांनी लिहिलेल्या सूची अथवा अनुक्रमणिका पाहिली असतां पुस्तकांत कोणत्या गोष्टी आहेत हे सामान्यतः कळेल.