पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिले. शकारंभानंतर भेद कधी होतच नाही. शकारंभापूर्वी निरनिराळी वर्षे घेऊन गणित केले, त्यावरून शकापूर्वी ५ हजार वर्षांच्या अलिकडे कधीच भेद होत नाहीं. शकापूर्वी ५२९४ व्या वर्षी रोहिणीच्या उत्तरतारेचा भोग सायन १० रा. २८ अंश २ कला येतो. आणि त्या स्थली शनि असतां त्याचा शर दक्षिण २ अंश ३४ कला आला.* यावरून तेव्हां आणि त्याच्यापूर्वी पुष्कळ काळ दर फेन्यांत रोहिणीशकटाचा भेद शनि करीत होता. मंगलकत शकटभेदही याच्यापर्वी बराच काल येतो. संहिताग्रंथांत शनिमंगलरुत शकटभेदाची फलें दिली आहेत. यावरून तो भेद कधी तरी झालेला असला पाहिजे. आणि त्याचा काल शकापूर्वी ५ हजारांच्या अलिकडे कधीच येत नाही. यावरून निदान शकापूर्वी ५ हजार वर्षे आमच्या देशांत ग्रहांचे ज्ञान झाले होते असे सिद्ध होते. ही नक्षत्रांचे ज्ञान याच्यापूर्वीच झाले असले पाहिजे हे उघड आहे. आणि यावरून वैदिककालाविषयी आणि ऋग्वेदसंहितेच्या कालाविषयी पूर्वी जे सांगितले आहे त्यास बळकटी येते. कृत्तिकादि गणना. कृत्तिकाः प्रथमं ॥ विशाखे उत्तम ॥ तानि देवनक्षत्राणि ॥ अनुराधाः प्रथमं ॥ अपभरणीरुत्तमं । तानि यमनक्षत्राणि ॥ यानि देवनक्षत्राणि ।। तानि दक्षिणेन परियति ।। यानि यमनक्षत्राणि ॥ ७ ॥ तान्यत्तरेण ।। ते. बा.१. ५. २. । कृत्तिका पहिले, विशाखा शेवटचे. ती देवनक्षत्रे, अनुराधा पहिलें, अपभरणी शेवटचे. ती यमनक्षत्रे. जी देवनक्षत्रे ती दक्षिणेकडून [ उत्तरेस ] फिरतात. जी यमनक्षत्रे ती उत्तरेकडून [दक्षिणेस].. वरील अर्थात कंसांत घातलेले शब्द मुळांत नाहीत. परंतु “दक्षिणेन" याचा "दक्षिणेकडून उत्तरेकडे " असा अर्थ तैत्तिरीयसंहितेतील तस्मादादित्यः षण्मासो दक्षिणेनैति षड्त्तरेण ।। तै. सं. ६. ५. ३. या वाक्यांत बेदभाष्यकार माधवाचार्य याने केला आहे ( कालमाधव, अयनप्रकरण पहा ). “दक्षिणेन" याचा अर्थ "अमुक एका पदार्थाच्या दक्षिणेस " असा एक संभवतो. परंतु तो दुसरा पदार्थ कोणता तो त्या वाक्यांत नाही. देवमक्षत्रे कांतिवृत्ताच्या दक्षिणेस आणि बाकीची उत्तरेस असें म्हटले तर तसे कधीच होण्याचा संभव नाही. कारण कृत्तिका क्रांतिवृत्ताच्या उत्तरेस आहेत; तेथून ३ नक्षत्रे क्रांतिवृत्ताच्या दक्षिणेस आहेत; पुढे २ उत्तरेस आहेत; आणि याप्रमाणे सर्वच अव्यवस्थित आहेत. आणि नक्षत्रांचे शर कधींच फिरावयाचे नाहीत (फिरले तर हजारों वर्षांत एखादी कला कमजास्त होतात). तेव्हां क्रांतिवृत्ताच्या संबंधे हे वर्णन आहे असे म्हणतां येत नाही. कृत्तिकादि नक्षत्रे विषुववृत्ताच्या दक्षिणेस आणि बाकीची उत्तरेस असे म्हटले तर तसेंही कधी होणार नाही. संपातभ्रमणा "प्रो० छत्रेकृत ग्रहसाधन कोष्टकांवरून गणित केले आहे. ते तपशीलवार एथे दिले तर वि. स्तार फार होईल ह्मणून देत नाही.