पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१४४) अंश २८ कला आहे. यांच्या दरम्यान जेव्हां कोणत्याही ग्रहाचा शर, तो ग्रह या तारांजवळ असतां असतो, तेव्हां तो या पांच तारांच्या मध्ये येतो. आणि तेव्हां तो शकटभेद करितो असें ह्मणतात. ग्रहाचा शर इतका असणे हे त्याच्या पाताच्या स्थितीवर अवलंबून असते. चंद्रपाताचा फेरा सुमारे १८ वर्षांत होतो; परंतु इतक्या कालांत चंद्र सुमारे ५/६ वर्षे मात्र शकटाचा भेद करितो. इ. स. १८८४ सप्टेंबरपासून मार्च १८८८ पर्यंत तो नेहमीं रोहिणीयोगतारेचे आच्छादन करीत असे असें मागे सांगितलेच आहे. (पृ. ४० ) या रोहिणीचंद्रसमागमाकडे आमच्या लोकांचे लक्ष्य फार प्राचीनकालापासून लागले आहे. चंद्राची रोहिणीवर फार प्रीति ही कथा पुराणांत प्रसिद्ध आहे. तैत्तिरीयसंहिता अष्टक दुसरा पाठ ३ अनुवाक ५ वा या सर्व *अनुवाकांत प्रजापतीच्या ३३ कन्या होत्या, त्या चंद्रास दिल्या होत्या, त्यांपैकी रोहिणीवर तो फार प्रीति करीत असे, इत्यादि कथा आहे. ह्या ३३ कन्या ह्मणजे २७ नक्षत्रांच्या २७ तारा आणि शिवाय कृत्तिकांच्या ६ तारा होत. आणि रोहिणीशी चंद्राचा निकट समागम होतो हे आकाशांत दिसून आल्यावरूनच ही कथा उत्पन्न झालेली आहे, हे उघड आहे. गर्गादिकांच्या संहितांत या योगाचे फार वर्णन आहे. बृहत्संहितेंत तर २४ वा सगळा अध्याय रोहिणीचंद्रयोगाविषयी आहे. शनि आणि मंगळ हे रोहिणीशकटाचा भेद करितील तर ते फारच अनिष्टकारक असें ज्योतिषसंहितांत प्रसिद्ध आहे. वराहमिहिर म्हणतो रोहिणीशकटमर्कनंदनो यदि भिनति रुधिरोथवा शशी ॥ किं वदामि यदि नष्टसागरे जगदशेषमुपयाति संक्षयं ॥ ३५ ॥ बृ. सं. ३४. ग्रहलाघवकार गणेशदैवज्ञ म्हणतो की:भौमायोः शकटभिदा युगांतरे स्यात् ॥ ग्र.ला. १११२. आणि हे खरे आहे. सांप्रत ह्या शकटाजवळ शनि येतो तेव्हां त्याचा शर दक्षिण सुमारे १ अंश ५० कला असतो, आणि मंगळाचा उत्तर सुमारे १२ कला असतो, ह्मणून ते शकटभेद करीत नाहीत. तर मग शनिमंगळ शकटाचा भेद करितील तर अनिष्ट फलें होतील हे संहिताग्रंथांत आलें कसें ? ही गोष्ट अगदीच असंभवनीय ह्मणावी तर तसें नाहीं. गुरूच्या संबंधे ही गोष्ट असंभवनीय आहे. ह्मणजे गुरूचा शर २ अंश ३५ कला कधीच होत नाही आणि गुरुरुत रोहिणीशकटभेद संहिताग्रंथांत कोठेच आला नाही. परंतु शनिभौमांचे तसें नाहीं. शनीचा स्पष्ट परमशर सुमारे २ अंश ४५ कला होतो. मंगळाचा २ अंश ५३ कला होतो. तेव्हां त्यांच्या पाताच्या एका चक्रांत रोहिणीजवळ असतां कधीतरी त्यांचा शर शकट भेदण्याजोगा होऊ शकेल. त्यांच्या पाताचें एक भ्रमण होण्यास ४०।५० हजार वर्षे लागतात. इतक्या कालांत केव्हां तरी त्यांनी शकटभेद केलाच पाहिजे. तर अशी स्थिति कधीं होती ह्याबद्दल शनीचें मीं गणित करून पा

  • ज्यातिावलार्स पुस्तकांत 'रजनीवल्लभ' या प्रकरणांत या योगाचे सविस्तर वर्णन आहे. त्यांत या अनुवाकाचा अर्थही दिला आहे. (आवृ. २ पृ. ५५ पहा.)