पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१४३) मर्यसिद्धांताप्रमाणे मध्यमभोग राहखेरीज सर्व ग्रहांचा शुन्य आहे. युरोपियन ग्रह सायन आहेत आणि सूर्यसिद्धांताचे निरयन आहेत. ह्मणून असें मटले असतां चालेल की वरील सायनग्रहांत रवि आणि दुसरा कोणताही ग्रह यांचें जें अंतर तें सूर्यसिद्धांतांतील रवि आणि तो ग्रह यांचें जें अंतर त्याहून जितकें कमीजास्त असेल, तितकी आमच्या ग्रंथांची चुकी. आणि व्हिटनीच्या ग्रहांत सूर्याच्या मागे सुमारे ३३ अंश बुध आहे; शुक्र ३२ अंश पुढे आहे. तेव्हां युरोपियन कोटकें शुद्ध असतील तर इतकी आमच्या ग्रंथांवरून आलेल्या मध्यमग्रहांत चुकी समजावयाची. आकाशांत ग्रह दिसतात ते मध्यमभोगाप्रमाणे दिसत नाहीत, स्पष्ट भोगाने दर्शविलेल्या स्थानी दिसतात. वरील स्पष्ट ग्रह पाहिले असतां युरोपियन ग्रहांत रवि आणि ग्रह यांचे फार अंतर म्हटले तर शनि २५ अंश सूर्याच्या मागे आहे आणि गुरु १४ अंश पुढे आहे. सूर्यसिद्धांताप्रमाणे सर्व ग्रह सूर्याजवळ ९ अंशांच्या आंत आहेत. सूर्यसिद्धांताप्रमाणे सर्व ग्रह अस्तंगत येतात, आणि गुरुवारी अमावास्येस सूर्यग्रहण येते. युरोपियन गणिताने मंगळ मात्र अस्तंगत येतो. व्हिटनेचा राहु १५ अंश कमी धरिला तर सूर्यग्रहण येते. आणि बुध १० अंश जास्त, शुक्र ९ अंश कमी, गुरु ४ अंश कमी, आणि शनि ११ अंश जास्त धरून गणित केले असतां स्पष्ट ग्रह असे येतात. रवि ३०३ ३५ ४२ गुरु ३१४ ६ ३६ बुध २९० ४० ६ शनि २८८१७ ३० शुक्र ३१२, २८ ४८ म्हणजे सर्व ग्रह अस्तंगत येतात. सारांश कलियुगारंभी आमच्या ग्रंथांप्रमाणे सर्व ग्रह एकत्र होते असे आहे. तशी वास्तविक स्थिति नव्हती. कदाचित् सर्व ग्रह अस्तंगत असतील, परंतु असेंही वर्णन महाभारतादिकांत नाही. कलियुगानंतर सूर्यसिद्धांतादि ग्रंथ होतपर्यंत निदान २६०० वर्षे गेली. त्या ग्रंथांच्या पूर्वी युगपद्धति मनुस्मृतीत सांगितल्याप्रमाणे होती. परंतु कलियुग अमुक काली लागले असें ठरलेलें होते असे दिसत नाही. "पूर्वी तीन युगांत झालेल्या वनस्पति " अशा अर्थाचें ऋग्यजुर्वेदांतलें वाक्य पूर्वी दिलें आहे (पृ. २३). त्यावरूनही कलियुग शकपूर्वी ३१७९ वे वर्षी लागले असें वेदवेदांगकालांत निश्चित झाले होते असे दिसत नाही. तेव्हां ग्रंथरचनाकालची गति घेऊन मागे जेव्हां सर्व ग्रह एकत्र होते असें गणितानें आलें तो कलियुगारंभकाल, असें ज्योतिषग्रंथकारांनी ठरविलें असेल असा संशय येण्यास जागा आहे. रोहिणीनक्षत्राच्या पांच तारा आहेत. त्या पांचांमिळून गाड्यासारखी आकरोहिणीशकटभेद. ति दिसते, म्हणून त्यास रोहिणीशकट ह्मणतात. पांचांत सर्वात उत्तरेकडची जी तारा आहे (एपसिलान टारि) तिचा शर दक्षिण २ अंश ३४ कला ४३ *विकला आहे, आणि योगतारेचा शर दक्षिण ५ * नाटिकलाल्मनाकमध्ये दिलेल्या तिच्या विषवांशक्रांतीवरून हा मी सूक्ष्म रीतीने काढला