पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३८) मंदादधः क्रमेण स्युचतुर्था दिवसाधिपाः॥ ७८ ॥ होरेशाः सूर्यतनयादधोधः क्रमशस्तथा ॥ ७९ ॥ भूगोलाध्याय. प्रथमार्यभटानेही शीघ्रक्रमात् चतुर्थाः दिनपाः' असेंच मटलें आहे. (काल क्रि.१६).. दिवसाचे होरासंज्ञक २४ विभाग करण्याची पद्धति ज्योतिषग्रंथांत वारोत्पत्तीसंबंधे व फलज्योतिषसंबंधे मात्र आहे. परंतु ज्योतिषसिद्धांतांत कालमाने सांगितलेली असतात त्यांत होरा हे मान नाही. व वैदिककालच्या व वेदांगकालच्या को. णत्याही ग्रंथांत तें नाहीं. होरा हा शब्द मूळचा संस्कृत नाही. त्या शब्दाची व्युत्सत्ति, 'अहोरात्र यांतील पहिले व शेवटचे अक्षर काढून टाकून राहणारा शब्द' अशा प्रकारची वराहमिहिराने सांगितली आहे. सारांश ती समाधानकारक नाही. खाल्डियाच्या लोकांत होरा हा कालविभाग फार प्राचीन कालापासून प्रचारांत होता, व सात वार आमच्या हल्लींच्याप्रमाणे होते असे दिसते. या सर्व गोष्टींचा विचार करितां मला वाटते की सात वार आमचे मूळचे नव्हत. खाल्डियाच्या लोकांकडून आमच्या देशांत आले. मेषादि संज्ञा संस्कृत आहेत. व क्रांतिवृत्ताचे १२ विभाग आमचे मूर नाहीत असें निश्चयाने ह्मणतां येणार नाही, असे वेदांगज्योतिष आणि भारत च्या विचारांत दाखविलेंच. तारासमूहांच्या आकतींवरून त्यांस नांवें देए कल्पना वेदांतही आहे. यावरून वारांप्रमाणे मेषादि राशि मूळचे आमचे नव्हत) निश्चयाने ह्मणतां येत नाही. तथापि त्या संज्ञा वैदिककालच्या नाहीत व वे ज्योतिषांत नाहीत. ह्मणजे शकापूर्वी १५०० या कालापर्यंत आमच्या देशांतव्हत्या. आतां इतर राष्ट्रांचा इतिहास पाहिला असतां इजिप्त देशांतील लोकांस इ. स. पूर्वी २१६० च्या सुमारास मेषादि राशि माहीत होते असे कोणी ह्मणतात ६. स. पूर्वी ३२८५ च्या सुमारास माहीत होते असे कोणी ह्मणतात. खाल्डियनहार कांस इ. स. पूर्वी ३८०० च्या सुमारास राशि आणि वार माहीत होते अस कोणी ह्मणतात. इ. स. पूर्वी १००० च्या पूर्वी राशिपद्धति दोघांस माहीत होती असें खचित दिसते.* व वार तर खाल्डियन लोकांस इ. स. पूर्वी ३८०० पूर्वीच माहीत होतें असें लेंग हा खात्रीने लिहितो. आमच्या देशांत शकापूर्वी १५०० पर्यंत दोन्ही मुळीच नव्हतीं असें वेदांगज्योतिषावरून दिसते. मेषादि संज्ञा प्रथम तारापुंजांच्या आरुतिविशेषांवरून पडल्या की काय याविषयी वाद आहे. आमच्या देशांत त्या परदेशांतून आल्या असल्या किंवा मूळच्या आमच्या असल्या तरी आकृतींशी त्यांचा संबंध दिसत नाही. अश्विनी, भरणा आणि कृत्तिकांच्या कांहीं तारा मिळून मेषाची (मेंढ्याची) आकति होत असें कांहीं नाहीं. राशिकमांत मेष प्रथम आहे, आणि अश्विनी नक्षत्रा

  • प्राकटर, लाकियर ह्यांचे इंग्रजी ग्रंथ, Ninteenth Century, जलाई २८९२ च्या अंकांतला लाकियरचा लेख पृ. ३४S. Laing's Human Origins, Chap एक 144-158 पहा.