पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यांची जशी रचना सांप्रत दृष्टीस पडते तशी पूर्णपणे वर सांगितल्या काली झाली असेल असे नाही. तरी शकापूर्वी १५०० यापूर्वी ती झालेली आहे. प्रो. म्याक्समूलर ह्यांच्या मतें वेदाचा काल असा आहे: इ. स. पूर्वी १७७ मध्ये बद्धाचें निर्वाण झाले. त्यापूर्वी सुमारे शंभर वर्षांत बुद्धधर्माचा उदय झाला. इ. स. पूर्वी ६०० च्या पूर्वी वैदिक ग्रंथांची रचना पूर्ण झालेली होती. त्यांचे सूत्र, ब्राह्मण, आणि मंत्र, असे तीन काल दिसून येतात. इ. स. पूर्वी ६०० पासून ८०० पर्यंत सूत्र काल, आणि इ. स. पूर्वी ८०० पासून १००० पर्यंत ब्राह्मण काल झाला. आणि ह्याच्यापूर्वी ऋग्वेदाच्या सर्व मंडलांचा संग्रह झाला होता. ऋग्वेदसूत्रांची प्रत्यक्ष रचना इ. स. पूर्वी १०००, १५००, २००० किंवा ३००० वर्षे झाली की कधी झाली, हे कोणी मनुष्य सांगू शकणार नाही. याप्रमाणे त्यांचे मत आहे. आणि हे बहुतेक युरोपियन मान्य करतात. ही अनुमाने केवळ इतिहास आणि भाषाशाख यांवरून आहेत. ऋग्वेदाची रचना किती प्राचीन असेल हे सांगतां येत नाही असे मत यांत दिसून येतेच. ते, आणि सूत्रादिक तीन कालांची मर्यादा प्रत्येकी दोनदोनशे वर्षे ही फार थोडी आहे, हे मनांत आणले असतां ज्योतिषगणितावरून वर ठरविलेली वैदिककालाची मर्यादाच घेतली पाहिजे असें दिसून येईल. श. पूर्वी १५०० वर्षे ही वेदांगकालाची पूर्वमर्यादा होय. सात वार आणि मेषादि राशि ह्यांविषयी विचार केला म्हणजे त्यावरून वेवेदांगकालमर्यादा. दांगकालाची उत्तरमयांदा ठरवितां येईल. सात वार आणि मेषादि राशि वेदांत नाहीत. बाकी ज्या ग्रंथांचा विचार ह्या भागांत झाला त्यांत अथर्वज्योतिष आणि याज्ञवल्क्यस्मृति यांखेरीज वार कोणत्यांतही नाहीत; आणि मेषादि राशि बौधायनसूत्राखेरीज कोणत्याही ग्रंथांत नाही. सूर्यसिद्धांतादि ग्रंथांत ही दोनही आहेत, हे सांगावयास नकोच. तथापि ह्या दोन गोष्टी मूळच्या आमच्याच असल्या तर वैदिककालांतल्या नाहीत हे निर्विवाद आहे. सात वारांचा जो क्रम आहे त्याची उपपत्ति अशी आहे :पृथ्वीभोंवतीं ग्रह फिरतात त्यांचा क्रम वरपासून घेतला तर शनि, गुरु, मंगळ, रवि, शुक्र, बुध, चंद्र असा आहे. अहोरात्राचे होरा या नांवाचे २४ विभाग करितात; आणि त्यांचे हे सात ग्रह अनुक्रमाने अधिप मानितात. अर्थात् अहोरात्रांत सर्व ग्रह तीन वेळा होऊन आणखी ३ होतात आणि चवथा ग्रह दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या होरेचा स्वामी होतो. पहिल्या दिवशी पहिल्या होरेचा स्वामी शनि घेतला तर दुसऱ्या दिवशी पहिल्या होरेचा आधिप रवि होतो. तिसन्या दिवशी आरंभी चंद्र येतो. दिवसाच्या प्रथम होरेचा अधिप तोच दिनाधिप म्हणजे वाराधिप (वार ) होय. याप्रमाणे शनि, रवि, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र असे अनुक्रमें वार होतात. ह्मणजे पृथ्वीभोवती फिरणाऱ्या ग्रहांतून वरूनखाली चवथा चवथा वार होतो. यावि सूर्यसिद्धांतांत झटले आहे: Pho n , pp. 91-96 (इ. स १८९१).