पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वा कनिकायुक्त सास्मिन्यौर्णमायावदन उघड, मनांत येते. परंतु सांप्रत ती नाही, आणि पूर्वी असल्याचे ज्ञापक कोठे आढळत नाही. पूर्णिमा तिथि ही पूर्णिमान्त मासाची किंवा शुक्ल पक्षाची अंत्यतिथि मानतात ; ती उत्तरमासांतली किंवा उत्तरपक्षांतली असें मानीत नाहीत, हे वेदांतील अनेक वाक्यांवरून उघड आहे; आणि सांप्रत प्रचार तसाच आहे. तेव्हां 'सास्मिन्पौर्णमासीति संज्ञायां ' या पाणिनि (४.२.२१) सूत्रावरूनही कृत्तिकायुक्त पूर्णिमा ज्या मासांत आहे तो कार्तिक, आणि तिच्या दुसऱ्या दिवशीं जो सुरू होईल त्याची पूर्णिमा मृगशीर्षयुक्त असल्यामुळे तो मार्गशीर्ष अशीच परिभाषा सिद्ध होते. सारांश कृत्तिकादि गणना सुरू झाल्यावर (श. पूर्वी ३००० नंतर ) मार्गशीर्षांत वर्षारंभ कांहीं प्रातांत प्रचारांत आला. प्रोटिळक यांचे झणणे आहे* की मार्गशीर्षास आग्रहायणिक असें नांव आहे, तें, तो वर्षारंभाचा मास ह्मणून नव्हे, तर अग्रहायण ह्या नक्षत्राच्या नांवावरून ते पडले आहे. आणि ज्याच्या पुढे वर्ष लागते, ह्मणजे ज्या नक्षत्री सूर्य आला असतां संपातांत असतो आणि वर्ष सुरू होते, तें अग्रहायण, असा अर्थ ते घेतात. माझ्या मते हा अर्थ आहेच; परंतु मार्गशीषांत वर्षारंभ करण्याचा प्रचार नव्हता, आणि मार्गशीर्षी पौर्णिमेच्या दुसरे दिवशीं वर्ष सुरू होत नसे, अशा दोन गोष्टी टिळक घेतात; किंवा त्यांच्या प्रतिपादनांत त्या गर्भित आहेत. तर त्या न घेतांही अग्रहायण याचा ते जो अर्थ करितात त्यास बाध येत नाही. मार्गशीर्ष हा वर्षाचा पहिला मास असे प्रत्यक्ष दाखले आहेत; तर ती गोष्ट नाकबूल करितां येत नाही. तसेच मृगशीर्षयुक्त पूर्णिमेच्या दुसरे दिवशी वर्ष सुरू होणें असंभवनीय नाही, आणि त्याप्रमाणे होत असे, हे वर दाखविलेंच आहे. आग्रहायणी हे नांव अमरकोशांत मृगशीर्ष नक्षत्राचे आहे. तो शब्द पाणिनीयांत ही तीन ठिकाणी आहे. (४. २. २२, ४. ३. ५०, ५. ४. मृगशीर्षादि गणना. ११०.) आग्रहायणी शब्दावरून आग्रहायणिक हे मार्गषीर्षाचे नांव साधलें आहे. (पाणिनि ४. २. २२.). आग्रहायणी याचा मुख्यत्वेकरून मार्गशीर्षी पौर्णमासी असा अर्थ वैयाकरण करितात. तसा केला तरी आग्रहायणिक हे नांव मार्गशीर्षाचे आहे, त्याअर्थी आग्रहायणी पूर्णिमेस मृगशीर्ष नक्षत्र ओघानेच आले. आणि आग्रहायणी याचा अर्थ जिच्या दुसऱ्या दिवशी वर्ष सुरू होते असा होत आला आहे. यावरून मार्गशीर्षपूर्णिमेस आग्रहायणी (मृगशीर्ष ) नक्षत्र असतां त्याच्या दुसरे दिवशीं वर्षारंभ करण्याची पद्धति होती ही गोष्ट निविवाद ठरते. या वर्षाचा जो पहिला मास त्यास सांप्रतच्या ज्योतिषपद्धतीने आणि पाणिनीच्याही पद्धतीने पौष हे नांव प्राप्त होते हे वर सांगितलेच आहे. आणि मागशीर्षांत वर्षारंभ होऊ लागला तो श. पूर्वी ३००० नंतर होऊ लागला हे वर सिद्ध केलेंच आहे. अर्थात् पौषांत वर्षारंभ ही पद्धति त्याच्यापूर्वीची असली पाहिजे हे कबूल करावेच लागते. अर्थात् त्या पद्धतीचा काल शकापूर्वी ३००० याच्या पूर्वीचा असला पाहिजे. त्याकालीं मृगशीर्ष नक्षत्र विषुववृत्तावर असण्याचा संभव नाही. तेव्हां शकापूर्वी ४००० या काली मृगशीर्षांत वसंतसंपात होता, याशिवाय दुसरे कारण या गोष्टीचे दिसत नाही.

  • Orion ch. IV.