पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्या नक्षत्री सूर्य येईल तेव्हां नेहमी असणार नाही. त्यास सुमारे ४३०० वर्षांनी दोन महिन्यांचा ( एका ऋतूचा) म्हणजे सुमारे २००० वर्षांनी एका महिन्याचा फरक पडेल*. म्हणजे अश्विनी नक्षत्री सूर्य असतां एकदा वसंत झाला तर पुढे ४। हजार वर्षांनी अश्विनींत सूर्य असतां ग्रीष्मऋतु होईल. आणि ८॥ हजार वर्षांनी पावसाळा होईल. सूर्य अश्विनींत आल्यापासून पुनः आश्विनीत येईपर्यंत मोजलेलें वर्ष हे नाक्षत्र सौर होय. सूर्य अश्विनीत असतां चंद्र पूर्णिमेस सुमारें चित्रांवर असतो, आणि त्या चांद्रमासाचें नांव चैत्र येतं. तेव्हां नक्षत्रावरून ज्याला चैत्र नांव पडले त्या चैत्रांत एकदा वसंतऋतु होऊ लागला, तर ४ हजार वर्षांनी ग्रीष्मऋतु होऊं लागेल. म्हणजे चैत्रांत एकदा वसंतारंभ झाला तर सुमारे २१५० वर्षे चैत्रांतच केव्हां तरी वसंतारंभ होत जाऊन पुढे २१५० वर्षांनी तो फाल्गुनांत होऊं लागेल. व पुढे २१५० वर्षांनी माघांत होऊं लागेल. (अर्थात चैत्रांत एकदा वसंतारंभ होऊ लागल्यापासून ४ हजार वर्षांनी ग्रीष्मारंभ होऊं लागेल.) सारांश चैत्र हा वसंताचा पहिला मास सुमारे २००० वर्षे मात्र असेल. चैत्र-वैशाख हे वसंताचे मास ही परिभाषा सर्व ग्रंथांत दिसून येते. ती स्थापित झाल्यावर पुष्कळ कालानें त्वारंभ मागें आला, म्हणून कांहीं ग्रंथांत मीन मेष हे मास म्हणजे फाल्गुन-चैत्र हे मास वसंताचे अशी परिभाषा आली. वतीप्रमाणे कांहीं पंचांगांत हल्ली ऋतु लिहितात. सांप्रत माघ-फाल्गुनांत वसंत होतो. तरी देखील चैत्र-वैशाख वसंत ह्या परिभाषेचे प्राबल्य आहेच. पूर्वीपासूनही तिचे इतकें प्राबल्य आहे की मधुमाधव ही मासनामें ऋतुसंबंधे आहेत, नक्षत्रांसंबंधे नाहीत, तरी मधु हा वसंतारंभ मास तसा चैत्र हा वसंतारंभ मास ह्मणून चैत्रालाच मधु असें नांव पडले आहे. चैत्रांतला वसंतारंभ मागे आला तेव्हां फाल्गुन-चैत्र हे वसंताचे मास अशी परिभाषा कांहीं ग्रंथांत आली; परंतु वैशाख-ज्येष्ठ हे वसंताचे मास आणि चैत्र हा शिशिराचा मास अशी परिभाषा कोणत्याच ग्रंथांत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करतां चैत्रादि संज्ञा प्रवृत्तींत आल्या तेव्हां चैत्रांत वसंतारंभ होत असे ही गोष्ट निर्विवाद दिसून येते. व यावरून चैत्रादि संज्ञा प्रचारांत येण्याचा काल काढितां येतो. वसंतसंपाती सूर्य येण्याच्या पूर्वी सुमारे एक महिना वसंताचा आरंभ होतो. म्हणजे सायन सूर्याचा भोग ११ राशि असतां होतो. आणि तेव्हां निरयन। चैत्र मास असणे म्हणजे चित्रा नक्षत्राचा भोग त्याहून ६ राशि जास्त म्हणजे (११+६=१७ = १२+५= ) ५ राशि असला पाहिजे. इ. स. १८५० मध्ये चित्रांचा सायन भोग ६ राशि २१ अंश होता म्हणजे ५१ अंश वाढला. तेव्हां (५१४७२ =) ३६७२-१८५० % इ.स.पूर्वी १८२२च्या सुमारास चैत्रांत वसंतऋतु होऊ लागला. आणि त्या सुमारास चैत्रादि संज्ञा प्रचारांत आल्या असें अनुमान होते.

  • अयनचलनाचा आणि सायनगणनेचा सविस्तर विचार दुसऱ्या भागांत येईल. संपाताची पूर्ण प्रदक्षिणा होते असे घेउन या प्रकरणांतले विवेचन केले आहे. त्या प्रदक्षिणेस सुमारे २६००० वर्षे लागतात.

सांपातिक म्हणजे सायन सौरवर्षाच्या मासांस सायन मास आणि नाक्षत्र सौराच्योस निरयन ह्या संज्ञा लावण्यास हरकत नाही, म्हणून सोईसाठी त्याच एथे घेतल्या आहेत.