पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १३२) कांहीं प्रांतांत वसंताचा आरंभ उशिरा होतो, काही प्रांतांत लवकर होतो. उशिरा होतो असें घेतले तर चैत्रादि संज्ञा प्रवृत्तिकाल वर काढिलेल्याच्या अलीकडे येईल. वसंतसंपातीं सूर्य येण्याच्या अगोदर सुमारे दीड महिना कांही प्रांतांत वसंतारंभ होतो. त्याहून अगोदर बहुधा होत नाही असे म्हणण्यास हरकत नाहीं. तेव्हां दीड महिना घेतला तर इ.स. पूर्वी सुमारें२९०० वर्षे हा काल येतो. वसंतारंभ कव्हां झाला असे समजावें ह्याविषयी संशय, ज्या नक्षत्रांवरून माहिन्यास नांवें पडली आहेत त्यांच्या भोगांचें अन्तर सर्वत्र सारखें नाहीं ही गोष्ट, इत्यादि सर्व गोष्टी विचारांत घेतल्या तरी फारच झाले तर चैत्रादिक संज्ञा उत्पन्न होण्याचा काल शकापूर्वी ४००० वर्षे हा होईल. याहून मागे जाण्याचा संभव अगदीच नाही. वेदांगज्योतिषांत चैत्रादिक संज्ञा आहेत. त्याचा काल शकापूर्वी सुमारे १४०० वर्षे हा आहे. तैत्तिरीयसहितेंत चैत्रादिक संज्ञा नाहीत, आणि त्या संहितेच्या कांहीं भागाचा काल शकापूर्वी सुमारे ३००० वर्षे हा आहे असे मागे दाखविलेच आहे. तैत्तिरीयसंहितेतील यज्ञक्रिया आणि ऋतुमासादिक कालावयव यांचा ज्याने विचार केला आहे त्यास असे दिसून येईल की त्या संहितेच्या काली चैत्रादिक संज्ञा असत्या तर त्या तींत आल्यावांचून राहिल्या नसत्या. यावरून श. पूर्वी. ३००० च्या पूर्वी चैत्रादिक संज्ञा नव्हत्या असे म्हणण्यास हरकत नाही. ज्यांत चैत्रादि संज्ञा नाहीत अशी मोठमोठी ब्राह्मणे बरीच (निदान चार ) आहेत. ती तैत्तिरीयसंहितेहून अर्वाचीन हे उघड आहे. एकंदर विचार करितां चैत्रादिक संज्ञा उत्पन्न होण्याचा काल शकापूर्वी २००० हा होय असे मला वाटते. कौषीतकी, शतपथ आणि पंचविंश या ब्राह्मणांच्या ज्या भागांत चैत्रादि संज्ञा आहेत ते भाग श. पूर्वी २००० आणि १५०० यांच्या मधल्या काळचे होत. ऋग्वेदसंहितेत पहिला ऋतु अमका असें प्रत्यक्ष कोठे सांगितलेले नाही, आणि वर्षारंभ. त्या गोष्टीचें ज्ञापकही कोठे नाही. शरद, हेमंत, वसंत. हे ऋतुवाचक शब्दच संवत्सर या अर्थी बरेच वेळा आले आहेत ; यावरून या कर्तृत वर्षारंभ ऋग्वेदसंहिताकाली होत असेल असें ह्मणण्यास जागा आहे. ग्रीष्म, वर्षा, शिशिर हे शब्द संवत्सर या अर्थी कग्वेदसंहितेत बहुधा कोठे आढळत नाहीत. यजुर्वेदसंहिताकाली आणि तदनुसार सामान्यतः पुढे सर्व वैदिककालीं वर्षारंभ वसंतऋतु आणि मधुमास ह्यांत होत असे हे मागें सांगितलेच आहे. (पृ ६८). इतर ऋतूंत वर्षारंभ होत असे अशाविषयीं वेदांत प्रत्यक्षप्रमाण तर नाहीच; परंतु उदगयनाबरोबर वर्षारंभ होत असे असें ज्ञापकही कोठे नाही असें माझें मत आहे. उदगयनाबरोबर वर्षांरंभ होत असे असें प्रो. टिळक इत्यादिकांचें ह्मणणे आहे त्याचा विचार पुढे केला आहे. वेदांगज्योतिषांत वर्षारंभ उदगयनारंभी आहे. तथापि सूत्रे, महाभारत, इत्यादिकांत वसंत हा पहिला ऋतु' आहे; आणि चैत्रवैशाख हे वसंताचे मास आहेत. यावरून वैदिककालानंतर ह्या दोन्ही पद्धति चालू असाव्या. त्यांत वसंतारंभी वर्षारंभ ह्या पद्धतीचे प्राधान्य होते असे दिसून येते; कारण वेदांगज्योतिषाशिवाय दुसरे कोठे तो वर्षारंभ नाही. शिवाय पुढील