पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पासून घेतली या ह्मणण्यास जागाच नाही. चिनी इत्यादि लोकांनी स्वतंत्रपणे नक्षवांची पद्धति स्थापिली असेल, तर भारतीयांनीही ती स्वतंत्रपणे स्थापिली असें निष्पक्षपाती विचार करणारास दिसून येईल. चैत्रादि संज्ञा वेदांत कोठे आल्या नाहीत असें मागें झटले; परंतु त्यानंतर काहीं वैवाहिना. ग्रंथांत त्या आढळल्या. शतपथब्राह्मणांत असें वाक्य आहे:-- योऽसौ वैशाखस्यामावास्या तस्यामादधीत... आत्मन्येवैतत्प्रजायां पशुषु प्रतितिष्ठति ।। श. बा. ११.१.१.७. शतपथब्राह्मणाची १४ कांडे आहेत. त्यांत पहिल्या 10 कांडांस पूर्व शतपथ ह्मणतात. त्यांत ६६ अध्याय आहेत. उत्तर शतपथांत ४ कांडे आणि ३४ अध्याय आहेत. वरील वाक्य ११व्या कांडांत आहे. याच्यापूर्वी जवळच तस्मान्न नक्षत्र आदधीत ॥ श. बा.११.१.१.३. ( नक्षत्रावर आधान करूं नये ) असे सांगितले आहे. आणि शतपथाच्या पूर्वभागांत नक्षत्रावरच आधान सांगितले आहे. ज्या अकराव्या कांडांत वरील वाक्य आहे त्यांत “वेदान्त " ह्मणून जो वेदाचा भाग, ज्यांत उपनिषद असतात, त्याचा उल्लेख दोन तीन वेळ आहे. आणि शतपथब्राह्मणाचें १४वें कांड तर वेदांतप्रतिपादकच आहे. त्यास बृहदारण्यक म्हणतात. तें प्रसिद्धच आहे. या प्रमाणावरून शतपथाचा उत्तरभाग पूर्वभागाहून अर्वाचीन असावा असे सहज दिसते. आणि चैत्रादि संज्ञा ब्राह्मणकालाच्या अगदी उत्तरभागी प्रचारांत आल्या, त्या पूर्वी नव्हत्या, असें ह्मणण्यास हरकत दिसत नाही. कौषीतकी (सांख्यायन ) ब्राम्हणांत तैषस्यामावास्याया एकाह उपरिष्टादीक्षेरन माघस्य वेत्याहुः । कौ. बा. १९.२. ३. यांत तैष (पौष ) आणि माघ या संज्ञा आल्या आहेत. परंतु याच वाक्याच्या पुढे माघाच्या आरंभी उदगयन अशा अर्थाचें एक वाक्य त्यांत आहे. यावरून त्या ब्राह्मणाच्या या भागाचा काल वेदांगज्योतिषाइतकाच (श. पूर्वी सुमारे १५०० ) , होय. पंचविंशब्राह्मणांत पुढील वाक्य आहे:मुखं वा एतत्संवत्सरस्य यत्फाल्गुनः पंचविंश बा. ५. ९. ९. यांत फाल्गुन हे नांव आले आहे. एकंदरीत विचार करितां चैत्रादि संज्ञा वेदाच्या संहितांत नाहीतच. ब्राह्मणांत फार क्वचित् आहेत. आणि वर सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मणकालाच्या शेवटी प्रचारांत आल्या असाव्या. चैत्रादि संज्ञा कधी प्रचारांत आल्या ह्याचा विचार करूं. आर्तव सौरवर्षापेक्षा नाक्षत्रसौरवर्ष सुमारे ५० पळांनी जास्त आहे. ऋतु आर्तव चैत्रादि संज्ञांचा काल. सौरवर्षावर अवलंबून आहेत. आज संपातीं सूर्य असेल तेव्हां जो कतु असेल तोच हजारों वर्षांनी संपातीं सूर्य येईल तेव्हाही असेल. परंतु एका नक्षत्री सूर्य येईल तेव्हां एकदा जो ऋतु असेल तोच