पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२९) अगदी मोघम आहे; धनिष्ठांचा शर फार उत्तर आहे. सूर्य ज्या नक्षत्री असतो ते नक्षत्र दिसत नाही. वगैरे कारणांनी क्रांतिवृत्ताच्या अमुक बिंदूत सूर्य असतां वेदांगज्योतिषांत सांगितलेले उदगयन होत असे हे निश्चयाने समजत नाही. यामुळे त्यावरून काढलेल्या कालांत १००० वर्षांची चूक असण्याचा संभव आहे.* वर मी दिलेले शतपथब्राम्हणांतलें वाक्य अद्यापि युरोपियनांच्या लक्ष्यांत आले नाही. वर्षांत १०।११ महिने तरी कृत्तिका दिसत असतात. जेव्हां त्या पूर्वेस उगवत असत तेव्हां पृथ्वीवर कोणत्याही स्थली उगवतांना पूर्वेसच दिसावयाच्या. सारांश यांत शंकास्पद कांहींच नाही. थेट पूर्व कोणती हे समजण्यांत एक अंशाची चूक झाली असली तर सुमारे २०० वर्षांची चूक पडेल. याहून जास्त चुकी पडण्याचा संभव नाही. सारांश कृत्तिकांचे पूर्वेस उगवणे हेच कृत्तिकादि गणनेचे कारण होय.त्या गोष्टीचा काल शकापूर्वी सुमारे ३००० वर्षे हा होय असें निर्विवाद सिद्ध होते. तैत्तिरीयसंहिता शतपथब्राह्मणापूर्वीची असली पाहिजे. तीत वेदकाल. कृत्तिकादि नक्षत्रे आहेत. तेव्हां तिच्या त्या भागाचा काल हाच किंवा याहून शेदोनशे वर्षे प्राचीन असावा. शतपथब्राह्मणांत वर सांगितलेलें वाक्य प्रत्यक्षच आहे. तेव्हां त्याच्या त्या भागाचा काल श. पूर्वी ३००० हाच किंवा त्याहून शेंदोनशे वर्षे अलीकडचा असेल. सामान्यतः असें ह्मणण्यास हरकत नाहीं की वेदाच्या ज्या ज्या संहिताब्राह्मणांत कृत्तिकादि नक्षत्रे आहेत त्यांच्या त्या त्या भागाचा काल श. पूर्वी सुमारे ३००० याच्या मागे पुढे शेंदोनशे वर्षांतला होय. ऋग्वेदसंहिता शतपथब्राह्मणाहून प्राचीन होय. तींत रुत्तिकादि नक्षत्रे नाहीत यावरून ती श. पूर्वी ३००० याहून प्राचीन आहे. वेदकालाचा आणखी विचार पुढे करूं. वेदांतली नक्षत्रपद्धति मूळची भारतीयांची नव्हे असें कांही युरोपियनांचे मणणे आहे. मला तर वाटते की नक्षत्रांशी चंद्राचा काही संबंध नक्षत्रपद्धति मूळची चा आहे हे ज्यांस समजत नाही आणि नक्षत्रांचीं कांहीं तरी कोणाची? नांवें ज्यांत नाहीत असे पृथ्वीवर कोणतेच लोक सांपडणार नाहीत. मग ते कितीही रानटी असोत. वेदांतली नक्षत्रपद्धति मूळची भारतीयांचीच होय याविषयी आणखी काही प्रमाणे नसली तरी रोहिणीचे आच्छादन चंद्र करितो यावरून उत्पन्न झालेली, चंद्राची रोहिणीवर अतिप्रीति आहे इत्यादि कथा वेदांता आहे, तिजवरूनच ती गोष्ट सिद्ध होईल. हिंदूंनी नक्षत्रे चीन, बाबिलोन किंवा कोणत्या तरी अज्ञात राष्ट्रापासून घेतली असें ज्या युरोपियनांचे झणणे आहे त्यांपैकी काहींच्या मते त्या गोष्टीचा काल इ. स. पूर्वी ११०० हून प्राचीन नाही. वेबरनें काल स्पष्ट सांगितला नाही. तरी तो त्याच्या मते इ. स. पूर्वी २७८० हून प्राचीन नसलाच पाहिजे. इ. स. पूर्वी ३००० या वर्षी भारतीयांस नक्षत्रे माहीत होती हे वर सिद्ध केलेच आहे, आणि त्याच्याही पूर्वीच्या ऋग्वेदसंहितेंत नक्षत्रे आहेतच. तेव्हां भारतीयांनी नक्षत्रे परक्या

  • Indian Antiqilary, XXIV. एप्रिल १८९५ चा अंक पहा. + तै. सं. २. ३. ५ ज्योतिर्विलास आ.२ पृ. ५५ ( रजनीवल्लभ ) पहा.

१७