पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२८) ह्यांत कत्तिका पूर्व दिशेपासून चळत नाहीत ह्याचा अर्थ त्या नेहमी पूर्वेस उगवतात, म्हणजे त्या विषुववृत्तावर आहेत, त्यांची कांति शून्य आहे, असा होय. सांप्रत त्या थेट पूर्वेस उगवत नाहीत; पूर्व बिंदूच्या उत्तरेस उगवतात. अयनगतीमुळे असें झालें आहे. अयनगति वर्षास ५० विकला धरून कृत्तिकांतील योगतारेची कांति शून्य असण्याचा काल काढिला तो शकापूर्वी ३०६८वें वर्ष हा येतो. संपातगति ४८ विकला धरली तर याहून सुमारे १५० वर्षे पूर्वी, ह्मणजे कलियुगारंभाचा सुमार, हा काल येतो. या कालची इतर तारांची क्रांति पाहिली तर रोहिणींतील अगदी उत्तरेकडची, हस्तांच्या दक्षिणेकडच्या ३, अनुराधांच्या २, ज्येष्ठांची, आणि अश्विनीची १, अशा तारा विषुववृत्ताजवळ येतात. परंतु थेट विषुववृत्तावर हस्तांतली एकादी तारा कदाचित् असेल, बाकी कोणतीही नव्हती. वरील वाक्यांत कृत्तिका पूर्वेस उगवतात असा वर्तमानकाली प्रयोग आहे. आणि अयनचलनामुळे त्या सर्वकाल पूर्वेस उगवण्याचा संभवच नाही. हल्ली उत्तरेस उगवतात. श. पूर्वी ३१०० च्या पूर्वी दक्षिणेस उगवत होत्या. यावरून शतपथब्राह्मणाच्या ज्या भागांत ही वाक्ये आहेत, त्याचा काल श. पूर्वी सुमारे ३१०० हा होय हे सिद्ध होतें. वेदांत नक्षत्रे सांगितली आहेत त्यांचा आरंभ कत्तिकांपासून आहे. वेदांगज्यो तिषकाली भरणीच्या चवथ्या चरणांत संपात होता. त्याच्याकृनिकादिगणना पूर्वी तो कृत्तिकांत असला पाहिजे; आणि त्यामुळे नक्षत्रारंभ काल. कृतिकांपासून झाला असें मानून बेंटली इत्यादिक युरोपि अन विद्वानांनी कत्तिकांत संपात असण्याचा काल इ.स. पूर्वी १५ वें शतक हा काढला आहे; परंतु तो चुकीचा आहे. वेदांगज्योतिषसंबंधे जी चूक झाली आहे तीच यांत झाली आहे. कृत्तिकांत संपात होता तेव्हां कृत्तिका सायनभोगशून्य असला पाहिजे. इ. स. १८५० मध्ये तो ५७ अंश ५४ कला होता. तेव्हां ( ५७१५४४७२= ) ४१७०-१८५० = इ. स. पूर्वी २३२० च्या सुमारास कृत्तिकांत संपात होता. बायो याने चिनी लोकांत नक्षत्रारंभ कृत्तिकांपासून होता त्यावरून त्यांच्या पद्धतीचा काल सुमारे इतकाच म्हणजे इ. स. पूर्वी २३५७ हा * ठरविला आहे तो मी दिलेल्या रीतीनेच ठरविला हे उघड आहे. बायोचे मूल लेख मी वाचले नाहीत. परंतु त्याने चिनीनक्षत्रांच्यासंबंधे मात्र ही रीति योजावी आणि हिंदूंच्यासंबंधे तसा कांहींच विचार करूं नये हे आश्चर्य आहे. कृत्तिका हे पहिले नक्षत्र, यावरून इ. स. पूर्वी २७८० पासून १८२० पर्यंत कोणता तरी काल येतो असें वेबरने म्हटले आहे. डा० थीबो यास भारतीय ज्योतिषाचें ज्ञान चांगले आहे. त्याचे मत नुकतेच प्रसिद्ध झाले आहे, त्याचा सारांश असा आहे की, “कृत्तिका पहिले नक्षत्र आहे याचे कारण कत्तिकांत संपात होता है होय, असे मानण्यास आधार मुळीच नाही. वेदांगज्योतिषांतल्या अयनस्थितीवरून जो काल येतो त्याहून मागचा काल दाखविणारी आकाशांतली स्थिति वेदांत कोठेच आजपर्यंत आढळली नाही. वेदांगज्योतिषांतील धनिष्ठारंभी उदगयन हे तरी

  • बर्जेसचें सूर्यसिद्धांताचे भाषांतर पहा.'