पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भारतातील ज्योतिषविषयक गोष्टी एकंदर सांगितल्या, त्यांत काही विशेष महत्वा च्या आहेत. भारतांत वार आणि मेषादि संज्ञा नाहीत यासार. मुळे त्या ग्रीक इत्यादि लोकांपासून घेतल्या असा संशय वेण्यास जागा नाही, म्हणून त्या सांगतो. (१) पांडवांच्या वेळी ग्रहांचे ज्ञान होते. मग पांडवांचा काल कोणताही असो. तो काल शकापूर्वी १५०० याहून अर्वाचीन असें कोणाचेंच मत नाहीं. मेषादि संज्ञा आणि सात वार प्रचारांत येण्यापूर्वी ह्मणजे ग्रीक ज्योतिषाचा आमच्या ज्योतिषाशी काही संबंध असेल तर तो होण्यापूर्वी (२) कांतिवृताचे १२ भाग ही पद्धति मूर्याच्या संबंधे तरी होती. (३) तेरा दिवसांचा पक्ष आला आहे यावरून रविचंद्रांच्या स्पष्टगतिस्थितीचे थोडंसें तरी ज्ञान होतें. (४) पक्ष, मास आणि संवत्सर यांचा क्षय आला आहे. तो सांप्रतच्याप्रमाणे असेल तर सूर्यचंद्रांच्या स्पष्टगतिस्थितींचे ज्ञान सांप्रत प्रमाण मुक्ष्म होते, आणि गुरु इत्यादि ग्रहांच्या मध्यमगतीचें ज्ञान होतें. (५) आकाशांतल्या इतर चमत्कारांचे अवलोकन होत असे, इतकेच नाही, तर ग्रहस्पष्टगतिज्ञानास उपयोगी असे ग्रहांचे उदयास्त, वक्रगति, यांचे अवलोकन आणि विचार होत असे. भारतावरून वरील विधाने जशी निश्चयाने करितां येतात तशी पुराणांवरून करितां येणार नाहीत. कारण त्यांच्या कालाविषयी निश्चितपणे कांही सांगतां येत नाही. आणि सर्व पुराणे वाचणे हे दीर्घकालाचे काम आहे. म्हणून पुराणांविषयी मी विचार करीत नाही. रामायणाचाही विचार मी केला नाही याचे कारण असे की त्यांत मेषादि संज्ञा आहेत. अर्थात् त्याचा काही भाग तरी वैदिककाल आणि वेदांगकाल यांहून अर्वाचीन आहे. काही भाग भारताहून प्राचीन असेल; परंतु त्याची निवड करणे कठिण आहे. पहिल्या भागाचा उपसंहार. या स्थली ओघाबरोबर सांगण्यास योग्य झालेल्या आणखी काही महत्वाच्या गोष्टी आणि महत्वाचीं अनुमाने सांगून मग या भागाचा शतपथब्राह्मणकाल. उपसंहार करूं. शतपथब्राह्मणांत पुढील वाक्ये आहतः एकं द्वे त्रीणि चत्वारीति वा अन्यानि नक्षत्राण्यथैता एन भूयित्रा यत्कृत्तिकास्तद्भमानमेवैतदुपैति तस्मात्कृत्तिकास्वादधीत ॥ २ ॥ एता ह वै प्राच्य दिशो न च्यवंते सर्वाणि ह वा अन्यानि नक्षत्राण प्राच्यै दिशश्यते तत्प्राच्यामेवास्यैतदिश्याहिती भवतस्तस्मात्कृनिकास्वादधीत ॥ ३॥ शतपथब्राह्मण, २. १. २.। अर्थ-इतर नक्षत्रे एक, दोन, तीन, चारच. ह्या कृत्तिका मात्र पुष्कळ. [जो ह्यांवर अग्न्याधान करितो तो ] त्यांचा पुष्कलपणा (विपुलता) मिळवितो. ह्मणून कृत्तिकांवर आधान करावें. ह्या मात्र पूर्व दिशेपासून चळत नाहीत. इतर सर्व नक्षत्र पूर्व दिशेपासून च्युत होतात. [ ह्यांवर आधान करितो ] त्याचे दोन अग्नि प्राची दिशेस आहित होतात. ह्मणून कृत्तिकांवर आधान करावें.