पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-me पाहिजे. सांप्रत जो क्षयमास येतो तो रविचंद्रांची स्पष्ट गति सूक्ष्मपणे माहीत असल्याशिवाय काढितां यावयाचा नाही. नक्षत्रनामावरून माससंज्ञा देण्याची . पद्धति दुसऱ्या भागांत सांगितली आहे (पंचांगविचारांत मासनामविचार पहा). तींत मासांचा क्षय वारंवार येतो. यावरून ती पद्धति भारतकाली असावी असे दिसते. पक्षक्षयविचार वर केला आहे, त्यावरून रविचंद्रांच्या स्पष्टगतीचें ज्ञान हल्लीप्रमाणे सूक्ष्म होते असें दिसत नाही. मास, पक्ष, दिवस यांचे क्षय सांप्रतच्याप्रमाणे असतील तर रविचंद्रांच्या फलसंस्कारांचे आणि स्पष्टगतीचे ज्ञान सांप्रतच्याप्रमाणे असले पाहिजे. भारतांत धूमकेतु, उल्कापात यांचे वर्णन पुष्कळ ठिकाणी आले सृष्टचमत्कार. आहे. पुढील श्लोक सूर्याच्या वर्णनांत आहे: त्वमादायांशुभिस्तेजो निदाघे सर्वदेहिनां । सर्वोषधिरसानां च पुनर्वर्षास मुंचसि ॥ ४९ ॥ वनपर्व, अ. ३. यांत पर्जन्यास कारण सूर्य हे स्पष्ट आहे. कांहीं स्थली भरतीओहोटीचा चंद्राशीं संबंध आला आहे. पृथ्वीच्या गोलत्वाविषयीही कांहीं स्थली आले आहे. यथा हिमवतः पार्श्व पृष्ठं चंद्रमसो यथा ।। न दृष्टपूर्वं मनुजैः । शांतिपर्व, अध्या. २०३ मोक्षधर्म. यांत चंद्राचें पृष्ठ कधी दिसत नाही हे आहे. सारांश, आकाशांतले आणि पृथ्वीवरचे चमत्कार पाहून त्यांचे कारण जाणण्याविषयी लोकांची प्रवृत्ति होती. ज्योतिषाच्या संहितामुहूर्तग्रंथांत सांगितलेल्या फलादिकांशी ज्यांचा संबंध आहे अशा गोष्टी भारतात पुष्कळ आहेत. युद्धाच्या वेळची संहितास्कंध. सांगितलेली ग्रहादिस्थिति सर्व फलांच्या उद्देशाने सांगितलेली आहे असें वर सांगितलेच आहे. यतो वार्यतः सूर्यो यतः शुक्रस्ततो जयः॥ २०॥ एवं संचिंत्य यो याति तिथिनक्षत्रपूजितः ॥ २५॥ विजयं लभते नित्यं सेनां सम्यक प्रयोजयन् ॥ शांतिपर्व, अ. १००. हे भीष्माने धर्मास सांगितले आहे. पुष्ययोगावर युद्धादिकार्थ गमन करणे शुभकारक असें तर अनेक स्थली आले आहे. एके स्थली विवाहनक्षत्र भगदेवताक आले आहे. वेदांत मात्र उत्तराफल्गुनीची देवता भग आहे. इतर सर्व ग्रंथांत ती पूर्वफल्गुनीची आहे. परंतु पूर्वफल्गुनी हे मुहूर्तग्रंथांत विवाहनक्षत्रांत नाही. अय पौष्यं योगमुपैति चंद्रमाः पाणिं कृष्णायास्त्वं [धर्मराज] गृहाणाद्य पूर्व ॥ ५ ॥ आदिपर्व, अ. १९८. द्रौपदीच्या विवाहप्रसंगीचे हे वाक्य आहे. पुष्य हे विवाहनक्षत्र नाही म्हणून "पुष्यत्यनेनेति तं, न तु पुष्यं. पौष्यमिति पाठे पुष्याय हितं" असें टीकाकार चतुर्धर म्हणतो, परंतु ते बरोबर दिसत नाही. आणखी, पांच दिवस क्रमाने पांच पांडवांनी द्रौपदीचें पाणिग्रहण केलें असें पुढे वर्णन आहे. परंतु सांप्रतच्या विवाहनक्षत्रांत लगत पांच अशी नक्षत्रे कोणतीच नाहींत. माता