पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२५) पद्मस्त पुत्राश्च एक वर्षशतमवनीपतयो भविष्यति । नवैतानंदान् कौटिल्यो ब्राह्मणः समुद्धरिष्यति ॥६॥ तेषामभावे मौाश्च पृथ्वीं भोक्ष्यति । कौटिल्य एवं चंद्रगुप्त राज्यभिषेक्ष्याति ॥ ७ ॥ यावत्परीक्षितो जन्म या वनंदाभिषेचनं । एतद्वर्षसहलं तु ज्ञेयं पंचदशोचरं ॥ ३२ ॥ विष्णुपुराण, अंश ४ अध्या. २४. यांत युधिष्ठिराचा नातू परीक्षित् याच्या जन्मापासून नंदाच्या अभिषेकापर्यंत १०१५ वर्षे झाली, पुढे नऊ नंदांनी १०० वर्षे राज्य केलें, पुढें चाणक्यशिष्य मौर्य चंद्रगुप्त राज्यावर बसला, असें वर्णन भविष्यरूपाने आहे. भागवत स्कंध १२ अध्याय १, २ यांतही हीच कथा आहे. तींत 'यावत्परीक्षितो' हा श्लोक आहे. त्यांत 'ज्ञेयं । या ठिकाणी 'शतं' असा पाठ आहे. ह्मणजे परीक्षितापासून नंदापर्यंत १११५ वर्षे होतात. अलेक्झांडर हिंदुस्थानांत आला होता त्याजकडे चंद्रगुप्त गेला होता.तो इ.स. पूर्वी ३१६या वर्षी पाटणा एथे गादीवर बसला. अलेक्झंडरच्या मागाहून प्रबल झालेला सरदार सेल्युकस ह्याच्या वेळी तो चंद्रगुप्त हिंदुस्थानांत मोठा प्रबल राजा होता. त्याचा नातु अशोक होय. हा सर्व इतिहास प्रसिद्ध आहे; आणि त्याविषयी वाद नाही. अलेक्झंडर, सेल्यूकस यांचा काल इत्यादिकावरून चंद्रगुप्ताचा काल वर सांगितलेला निश्चित झालेला आहे. परीक्षितीपासून नंदापर्यंत १०१५ किंवा १११५ वर्षे गेली हे विष्णुपुराण आणि भागवत यांतलें वर्णन खरे असेल तर पांडवांचा काल इ.स. पूर्वी सुमारे १४३१ किंवा १५३१ येतो. बहुतेक युरोपियन विद्वान् पांडवांचा हाच काल घेतात. माझ्या मते पांडवांचा काल शकापूर्वी १५०० पासून ३००० पर्यंत कोणता तरी आहे; त्याहून प्राचीन नाही. ग्रहगतिज्ञान. भारतरचनाकालीं ग्रहगतीचे ज्ञान बरेंच झाले होते असे दिसून येते. पुढील वर्णन पहाः क्षयं संवत्सराणां च मासानां च क्षयं तथा ॥ ४६ ।। पक्षक्षयं तथा दृष्ट्वा दिवसानां च संक्षयम् ॥ शांतिपर्व, अ. ३०१ मोक्षधर्म. यांत संवत्सर, मास, पक्ष, दिवस यांचा क्षय आला आहे. यांतील दिवसाचा क्षय वेदांगज्योतिषांत आहे. पक्षक्षय महाभारतांत दुसरे ठिकाणी आला आहे त्याचे विवेचन वर केलेच आहे (पृ० ११४). याशिवाय मास आणि संवत्सर यांचे क्षय ह्यांत आले आहेत. सुमारे ८५ वर्षांनी संवत्सराचा क्षय होत असतो. (दुसरा भाग, पंचांगविचार यांत संवत्सरविचारांत उदयपद्धति आणि मध्यमराशिपद्धति पहा.) परंतु त्यास गुरुगति राशीसंबंधे सांगण्याची पद्धति पाहिजे. भारतांत मेषादि संज्ञा नाहींत, किंवा ग्रहांची स्थिति कांतिवृत्ताच्या द्वादशधा भागानुसार सांगण्याची पद्धति नाही. यावरून मध्यमराशिभोगावरून संवत्सर ठरविण्याची पद्धति भारतकालीं असेल असे वाटत नाही. या पद्धतीहून द्वादशसंवत्सरपद्धति प्राचीन आहे. ती गुरूच्या उदयास्तावर अवलंबून आहे. तीत संवत्सरांचा क्षय वारंवार होतो. ती पद्धति भारतकाली असावी असें अनुमान होते. मध्यमराशिपद्धति असेल तर गुरूची मध्यमगति सूक्ष्मपणे माहीत झाली असली