पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रा. रा. व्यंकटेश बापूजी केतकर यांनी वर (पृष्ठ ११८) सांगितलेल्या सप्तर्षीसंबंधी श्लोकाचा अर्थ युधिष्ठिरशक विक्रमापूर्वी २५२६ वर्षे चालू होता असा करून, पांडव हे शकापूर्वी ( २५२६+१३५=) २६६१ ह्या वर्षी होते असे मानून, शकापूर्वी २६६२ वे वर्षी मार्गशीर्षपौषांत झणजे इ. स. पूर्वी २५८५ वे वर्षी नवंबरच्या ८ वे तारखेस युद्ध सुरू होऊन २५ वे तारखेस समाप्त झाले असे सांगून, कार्तिक वय ३० गुरुवारचे प्रातःकालचे ग्रह केरोपंती ग्रहसा. को. या पुस्तकावरून करून त्यांस अयनांश १।१३।५७ देऊन निरयन ग्रह असे काढले आहेतः रा. अं. क. नक्षत्र. रा. अं. क. नक्षत्र. रवि ७ २४ ... शुक्र ७ १० ३३ अनुराधा. मंगळ ३. ८ ३० पुष्य.. | शनि ६ ७ ५१ स्वाती. गुरु ७ २४ ४८ ज्येष्टा. | राहु ८ १९ ३९, चंद्र मार्गशीर्ष शु. १५ शुक्रवारचा १२७।३० मृगनक्षत्री काढिला आहे. शुक्राची स्थिति 'श्वेतोग्रहः प्रज्वलितो ज्येष्टामाक्रम्य तिष्ठति। या भारतोक्त श्लोकास अनुसरून आहे असें ते ह्मणतात. मार्गशीर्षांत युद्धारंभी व अंती ग्रहणे झाली असें गणिताने दाखवून त्यांत शेवटच्या ग्रहणाच्या वेळी जयद्रथवध झाला असे ते मणतात. हे भारताशी विरुद्ध आहे, व ग्रहस्थिति भारताशी मिळत नाही. तेव्हां केतकरांनी काढलेला काल त्याज्य होय.* . भारतांतल्या ग्रहस्थितीवरून पांडवांचा काल अद्यापपर्यंत निश्चयात्मक निघाला नाही, यावरून ती ग्रहस्थिति खोटी असेल, असें ह्मणतां येत नाही. कर्ण आणि व्यास यांच्या भाषणांतलीग्रहस्थिति खरी आहे आणि ती थेट पांडवांच्या कालापासून सांगण्यांत असलेली भारतांत आली आहे अशी माझी समजूत आहे.तिचा मेळ आपल्यास बसवितां येत नाही असेंच ह्मणणे योग्य दिसते. रा० रा० जनार्दन हरी आठल्ये यांणी लेले यांच्या मताचे खंडन लिहिलेले मी पाहिले. त्यांनी निरयन मानानेच फलज्योतिषास अनुसरून ती स्थिति बसविण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु तो चांगला किंवा बराच तरी सिद्धीस गेला आहे अमें मला वाटत नाही. ह्या ग्रहस्थितीचा मेळ कोण कसा घालील तो घालो. पांडवकालीं चैत्रादि संज्ञा प्रचारांत होत्या. आणि त्या संज्ञा शिकापूर्वी ४ हजार वर्षांच्या पूर्वी असण्याचा संभवच नाही. (असें पुढें सिद्ध केले आहे.) यावरून पांडवांचा काल शकापूर्वी ४००० वर्षांच्या पलीकडचा असूं शकणारच नाहीं. प्रसंगोपात्त विष्णुपुराण आणि श्रीमद्भागवत यांवरून पांडवांचा काल दिसून येतो तो लिहितों: महानंदिसुनः गदागर्भोद्भवोऽतिलुब्धो महापो नंद: परशराम इवापरोऽखिलक्षत्रियांतकारी भविता ॥ ४ ॥ तस्याप्यष्टौ सुताः सुमाल्याद्या भवितारस्तस्य च महापद्मस्यानु पृथ्वीं भोक्ष्यति । महा.

  • केतकरांचं गणित व त्यावरचे आक्षेप वगैरे सविस्तर पाहणे तर इ.स. १८८४ मे व जूनच्या इंदुप्रकाश व पुणेवैभव या पत्रांत पहा.

शिक आणि इसवी सन यांत अंतर ७८ वर्षांचे आहे. ज्योतिषगणितान ठरलेल्या शकापूर्वीच्या एकाद्या गोष्टीच्या कालांत अनेक कारणांनी ७८ वर्षांचा फरक सहज पडण्याचा संभव आहे. हागून शकापूर्वी अमुक वर्षे असे मी झटले आहे तेथे इ. स. पूर्वी असंही समजण्यास हरकत नाही.