पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१०६) अमावास्याष्टका वृद्धिः कृष्णपक्षोऽयनद्वयं ।। द्रव्यं ब्राझणसंपत्तिविषुवत्सूर्यसंक्रमः॥ २१ ॥ व्यतीपातो गजछाया ग्रहणं चंद्रसूर्ययोः ॥ आचाराध्याय. यांत सूर्यसंक्रम असा शब्द आहे. परंतु त्यावरून त्यावेळी मेषादि राशिसंज्ञा प्रचा रांत होत्या असेंच अनुमान काढले पाहिजे, असें नाहीं. क्रांतिवृत्ताचे कारण याज्ञवल्क्यस्मृतींत त्या संज्ञा प्रत्यक्ष कोठेच आल्या १२ भाग. नाहीत आणि एका ठिकाणी नक्षत्रांचा उल्लेख “ कत्तिकादि भरण्यन्तं ( १.२६७)" असा आहे. मेषादि विभागांबरोबर नक्षत्रे अश्विन्यादि पाहिजेत. वेदांगज्योतिषकाली मेषादि संज्ञा प्रचारांत नसून क्रांतिवृत्ताचे १२ भाग असावे असें दिग्दर्शन मागे केलेच आहे. सात वार आणि मेषादि १२ राशि ही हिंदुलोकांनी युरोपियनांपासून घेतली असं युरोपियन विद्वानांचे म्हणणे आहे. आणि त्यावरून सकद्दर्शनी असें मनांत येते की ज्या संस्कृत ग्रंथांत वार आहेत त्यांत मेषादि राशि असल्याच पाहिजेत. परंतु अथर्वज्योतिषांत वार असून राशि नाहीत हे मागें (पृ. १००) दाखविलेंच आहे. आणि पुढे महाभारतविचारांत स्पष्टपणे दिसून येईल की वार आणि मेषादि संज्ञा प्रचारांत येण्यापूर्वीच निदान सूर्यगतीसंबंधे तरी कांतिवृत्ताचे १२ विभाग भारतीयांनी मानिले होते. आणि क्रांतिवृत्ताचे १२ किंवा अथर्वज्योतिषाप्रमाणे ९ भाग पाडले तरी एका भागांतून दुसऱ्या भागांत सूर्याचे जे जाणे त्यास संक्रमण ही संज्ञा लावितां येईल. याज्ञवल्क्यस्मृतीत वरील वाक्यांत दोन अयनें आणि विषुवत् यांबरोबर संक्रम शब्द आला आहे. यावरून त्यावेळी क्रांतिवृत्ताचे बारा भाग होते असें सिद्ध होते. असो; अथर्वज्योतिष आणि याज्ञवल्क्यस्मृति यांवरून असे सिद्ध होते की सात वार आणि मेषादि संज्ञा एककालींच प्रचारांत आल्या नाहीत. मेषादि संज्ञांपूर्वीच सात वार प्रचारांत आले होते. वरील श्राद्धकालाच्या वाक्यांत वृद्धि शब्द आला आहे. परंतु तो ज्योतिषसब धाचाच झणजे २७ योगांपैकीच आहे असें ह्मणतां येत नाही. योग. त्याच वाक्यांतील द्रव्य, ब्राह्मण संपत्ति, यांप्रमाणे धान्यादिकांची वृद्धि असा त्याचा अर्थ असावा असे मला वाटते. त्याच वाक्यांत व्यतीपात शब्द आहे. तो ज्योतिषसंबंधाचाच हे निःसंशय दिइतर गोष्टी. सते. दुसरे एके ठिकाणी (प्रायश्चित्ताध्याय श्लोक १७१) ग्रहसंयोगजैः फलैः ।। असें आलें आहे. यावरून ग्रहसंयोग झणजे ग्रहांच्या युति यांजकडे लोकांचें लक्ष्य लागले होतें इतकंच नाही, तर त्यांवरून शुभाशुभही पाहूं लागले होते असे दिसून येते... मेषादि संज्ञा प्रचारांत येण्यापूर्वीच राहु केतु, सात वारांचा क्रम, व्यतीपात, आणि ग्रहयुति, यांचे ज्ञान भारतीयांस होते ही गोष्ट महत्वाची आहे, येवढेच पथे सांगतो. याविषयी जास्त विचार पुढे करूं. याज्ञवल्क्यस्मृतीचा काल इतर प्रमाणांनी निर्णीत झालेला असता तर या गोष्टींवरून आणखी महत्वाचीं अनुमाने काढतां आली असती.