पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१०७) पितृयानोऽजवीथ्याश्च यदगस्त्यस्य चांतरं ॥ तेनानिहोत्रिणो यांतिस्वर्गकामादिवं प्रति ।। १८४॥ तत्राष्टाशीतिसाहला मुनयो गृहमेधिनः ॥ सप्तर्षिनागवीथ्यतेदेवलोकं समाश्रिताः ॥ १८७ ।। प्रायश्चित्ताध्याय. यांत सप्तर्षि आणि अगस्त्य या तारांचा उल्लेख आहे. तसेच गर्गादिकांच्या संहितांत नक्षत्रांच्या वीथि मानल्या आहेत, त्यांतील अज आणि, नाग या दोन विधि यांत आल्या आहेत. वीथि आणि त्यांत येणारी नक्षत्रे यांविषयी मतभेद आहेत. कोणाच्या मते ९ वीथि आहेत, कोणाच्या मते ३ आहेत. त्याबद्दल गर्गपराशरादिकांची मतें भटोत्पलाने बृहत्संहिता शुक्रचार यावरील टीकेंत सविस्तर सांगितली आहेत. नक्षत्रांच्या निरनिराळ्या दिशांनी ग्रह जातात त्यासंबंधे या वीथि कल्पिल्या आहेत आणि वरील श्लोकांत त्या आल्या आहेत. यावरून याज्ञवल्क्यस्मृतिकालीं ग्रहगतीकडे भारतीयांचे चांगले लक्ष्य लागले होते असे दिसून येते. आकाशाच्या उत्तरगोलार्धात देवलोक आणि दक्षिण गोलार्धात पितृयाण आहे अशी समजूत वरील श्लोकांत दिसून येते. शतपथब्राह्मणांतल्या कल्पनेशी (पृ. ३४) हिचे साम्य आहे. निरुक्तांतला अयनांसंबंधी एक चमत्कारिक उतारा वर दिला आहे; (पृ.१०२), त्यांतल्यासारखें वर्णन याज्ञवल्क्यस्मृतींत अ. ३ श्लो. १९२ पासून १९७ पर्यंत आहे. चंद्र चांगल्या नक्षत्रावर असतां अमुक करावें (१.१८० इत्यादि), अमुक नक्षत्रावर अमुक धर्मकत्ये करावी, इत्यादि सांगितले आहे. “यस्य यश्च ग्रहो दुष्टः स तं यत्नेन पूजयेत्" असें एके ठिकाणी झटले आहे. (१.३०६). राहूचें सूतक आले आहे ; तिथि आणि मुहूर्त आले आहेत ; ज्योतिर्विदाचें पूज्यत्व वर्णिलें आहे; (१.३१२, ३३२). महाभारत महाभारतांत ज्योतिषविषयक उल्लेख इतके आहेत की ते सर्व एथे देणे ह्मणजे फार विस्तार होईल. त्यांतील जेवढी वाक्यें प्रस्तुत पुस्तकाच्या विषयास विशेष उपयोगाची आहेत त्यांचा मात्र एथे विचार करूं. हा विचार करण्यापूर्वी महाभारतग्रंथाच्या कालाविषयी थोडासा विचार के ला पाहिजे. ह्मणजे त्यावरून त्यांतील ज्योतिषविषयक वचनांचे महत्व विशेष रीतीनें स्थापित होईल. महा भारत अमक्याच कालीं झालें असें निःसंशय निर्णीत होणे कठिण आहे. तथापि अनुमानाने त्याचा काल काढतां येईल. स्वतः महाभारतावरून झटले तर तें व्यासाने रचलें, वैशंपायनाने जनमेजयास सांगितले, इत्यादि गोष्टींवरून पांडवकालींच किंवा त्यानंतर लवकरच त्याची रचना झाली असें होतें. पाणिनीच्या वेळी महाभारत* होते असे दिसते. आश्वलायनसूत्रांत तर महाभारताचा उल्लेख प्रत्यक्षच आहे. आणि आश्वलायन हा पाणिनीच्या पूर्वीचा असें भाषेच्या इतिहासावरून सिद्ध आहे. एकंदरीत महाभारत ग्रंथ फार प्राचीन आहे. आतां हें खरेंसांप्रत जें महाभारत आपण पहातों त्यांत पुष्कळ भाग अर्वाचीन भारत माहीत होते असे प्रो० कुंटे यांचे मत आहे. Viciesitudes of Aryal ते इतर सभा p. 448 पहा.