पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दीकेंत घेतले आहेत. ते कक्पाठांतले ३५ वा व ३६ वा हे दोन शेवटचे आहेत, व त्यांचा अनुक्रम पाठाप्रमाणे आहे. यजुःपाठाप्रमाणे नाही. यजुःपाठांत अनुकम हे श्लोक चवथा आणि तिसरा हे आहेत. आणि टीकेच्या पूर्वापर संदर्भावरून दिसते की पहिले किंवा शेवटचे श्लोक घेणे तेथे इष्ट होते. यावरून या सूर्यदेवाच्या वेळीही पाठ मुख्य होता. सूर्यदेवयज्वन् याचा काल माहीत नाही. परंतु तो भटोत्पलाइन अर्वाचीन असावा. सूर्यदेवाच्या याच उल्लेखांत ३५ व्या श्लोकाच्या उत्तराधीत "तद्वत् " याबद्दल " तथा " आहे. आणि “ तथा? हे पाठ आणि यजुःपाठ या दोहोंतही नाही. तेव्हां " तथा " हे मूळचें मूर्यदेवाचेंच असेल तर त्यावेळी त्याच्या प्रांतांत तरी वैदिकपाठ हल्लीप्रमाणे कायम झाला नव्हता असे दिसते. वराहमिहिर, भटोत्पल, सूर्यदेवयज्वन यांस यजुःपाठ माहीत होता किंवा नव्हता ह्याविषयीही काही सांगता येत नाही. परंतु यजुःपाठही प्राचीन दिसतो. कारण त्यांत पाठांतले ६ मात्र श्लोक नाहीत. त्यांतही महत्वाचे असे १३, १९, ३३ हे तीनच नाहीत. आणि पाठाहून जास्त १३ आहेत ते वेदांगज्योतिषपद्धति प्रचारांत होती तेव्हांचेच आहेत हे त्यांतील विषयावरून निःसंशय आहे. कदाचित् ते लगधाचेच असतील. तसेंच यजुःपाठ श्लोक ३६ यांत क्रूर आणि उग्र नक्षत्रे सांगितली आहेत. ती इतर ज्योतिषग्रंथांशी मिळत नाहीत. यावरूनही तो प्राचीन दिसतो. परंतु त्यांतील २४ वा श्लोक पाठाहून शब्दरचनेने अगदी भिन्न आहे, आणि २१ वा बराच भिन्न आहे. यावरून आणि दोन्ही पाठांतील जे श्लोक लागले नाहीत त्यांतले कांहीं समानार्थक आणि काही कदाचित् परस्परांशी विरुद्धार्थकही असावेत असे मला वाटते, यावरून मूळच्या लगद्यश्लोकांहून कांहीं तरी जास्त श्लोक मागाहून यजुःपाठांत आले असावे. वेदांगज्योतिषाच्या दोन्ही पाठांत श्लोकांचा क्रम संगतवार नाही. विषयसंगत्यनुरूप रचना केली असतां श्लोकक्रम पुष्कळ फिरेल. यावरून दिसते की सांप्रतच्या क्रमाने रचना मागाहून झाली असावी. आणि ती होतांना मूळचे कांहीं श्लोक मुळीच सुटले असतील, असा संभव दिसतो. काष्ठा आणि अक्षर ही परिमाणे एकाच श्लोकांत आली असून त्यांचा इतर परिमाणांशी संबंध नाही आणि त्यांचा उपयोग कोठेच आला नाही. परंतु कारणावांचून ते शब्द आले नाहीत, हे उघड आहे. यावरून कांहीं श्लोक लोपले असतील, या ह्मणण्यास दृढता येते. वेदांगज्योतिषांत चंद्रसूर्याच्या मात्र गति आहेत. ग्रहांविषयी काही सांगितले ग्रहगति. नाही. काही श्लोक लागत नाहीत, तरी त्यांत, लागले आहेत त्यांहून काही जास्त महत्वाचा विषय नाही, असें मी खात्रीने ह्मणतों. चंद्रसूर्यांच्या गति सांगितल्या आहेत त्या नेहमी सारख्या झणजे मध्यम आहेत. परंतु ह्या गति प्रतिक्षणी कमजास्त होत असतात. यामुळे सूर्याची गाति मध्यम. स्पष्ट स्थिति सुमारे २ अंश मागेपुढे होते. चंद्राची ८ अंश मागेपुढे होते. तर स्पष्ट स्थिति आणि मध्यम स्थिति यांतला • डा. केर्नचं आर्यभटीय, प्रस्तावना पहा. +वर्तलाच ३६० अंश या जातीचे.