पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भिन्नपणा, ज्याला फलसंस्कार म्हणतात, तो काढणे हा जो ज्योतिषांतला फारच महत्वाचा विषय तो वेदांगज्योतिषकालीं माहित होता की नाही हे सांगता येत नाही. ब्रह्मगुप्तांची आर्या वर दिली आहे ( पृ०९४), तीवरून तो स्पष्ट स्थितीचे अज्ञान होतं असें ह्मणतो असे दिसते. सूर्यचंद्रांच्या गतिस्थितीचें नेहमी सूक्ष्म अवलोकन आणि त्याचा विचार ही नसतील तर त्यांच्या मध्यम आणि स्पष्ट या गतिस्थितींतील भेद लक्ष्यांत येणार नाही. ग्रहणे पर्वांताच्या सुमारास होतात हे माहीत असेल तर ग्रहणांच्या वेळी तो भेद समजण्यांत येण्यासारखा आहे. स्पष्टगतिस्थितींचें ज्ञान नसले तरी मध्यमांचें होतें ही गोष्टही भूषणास्पद आहे. चंद्रसूर्याच्या एका प्रदक्षिणेस आरंभ केव्हां होतो हे पाहून ठेवून तेव्हांपासून कांहीं प्रदक्षिणा पुन्या होतपर्यंत किती काळ जातो तो मोजणे, असे केल्याशिवाय एका प्रदक्षिणेचा काल आणि रोजची मध्यम गति ही निघणार नाहीत. आणि इतका अनुभव वेदांगज्योतिष रचण्यापूर्वी घेतला असला पाहिजे हे उघड आहे. सूर्य दिसतो तेव्हां त्याच्या जवळची नक्षत्रे दिसत नाहीत. यामुळे सौरवर्षाचे मान बरेंच चुकलें असें दिसते. मध्यम गतीमुळे वेदांगज्योतिषांतील अयने आणि विषुवे परस्परांपासून १८३ च्या अंतरावर आले आहे. परंतु इ० स० पूर्वी १४०० च्या सुमारास ती पुढील अंतराने होत असत. दिवस घटी. उदगयनापासून प्रथम विषुवापर्यंत प्रथम विषुवापासून दक्षिणायनापर्यंत दक्षिणायनापासून द्वितीय विषुवापर्यंत ९१३० द्वितीय विषुवापासून उदगयनापर्यंत ८८ ३५ ३६५१५ वर्ष याअर्थी संवत्सर आणि वर्ष हे दोन शब्द मात्र ऋग्वेद ज्योतिषांत आले आहेत. यजुर्वेद ज्योतिषांत या दोहोंखेरीज आणखी अब्द हा आला आहे. (श्लोक २८). यांतील वर्ष आणि अब्द हे शब्द वेदांत शतपथब्राम्हणांत मात्र आले आहेत. मास अमान्त. मास अमांत आहेत हे लक्ष्यात ठेवण्यासारखे आहे. वेदांगज्योतिषपद्धतींत धनिष्ठा हे आदिनक्षत्र आहे. नक्षत्रदेवता #.पा. *लो. पहिले नक्षत्र. २५।२६।२७ यांत आहेत, त्यांचा आरंभ वेदाप्रमाणे कतिकांपासून आहे. धनिष्ठादिगणनेविषयीं महाभारतांत उल्लेख आहे. ६० वर्षांच्या आणि १२ वर्षांच्या बार्हस्पत्यसंवत्सरचक्रांचा आरंभ धनिष्ठांपासून आहे. वेदांगज्योतिष झाले त्याकाळी पूर्णांकपरिकर्मचतुष्टय ( बेरीज, वजाब की, गुणाकार, भागाकार) आणि वैराशिक यांची माहिती होती, इतकेच नाही तर भिन्न परिकर्मचतुष्टयं ( व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज इत्यादि ) यांचे चांगलें ज्ञान होते असे