पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घालण्याचा नियम मात्र बदलणे, युगारंभी माघारंभी धनिष्टांत उदगयन आणणे आणि पंचसंवत्सरांची नांवें कायम ठेवणे अशी पद्धति बरीच शतकें चालण्यास हरकत नाहीं सारांश वेदांगज्योतिषपद्धति मूळच्या निजरूपानें सुटली तरी कांहीं भिन्न रूपाने पुष्कळ काळ चालली असावी आणि यामुळेच गर्गादिकांच्या लेखांत तिचे उल्लेख सांपडतात. साठ संवत्सरांचें बार्हस्पत्यसंवत्सरचक पंचवर्षात्मक युगपद्धतीच्या नमुन्यावरच उत्पन्न झालेले आहे. याविषयी जास्त विवेचन दुसऱ्या भागांत येईल. या पद्धतीला वेदांगत्व आले आहे, यावरून तिचें पुष्कळ महत्व होते असे दिसतें हें वेदांगत्व कधीं आलें हें निश्चयाने सांगता येणार नाही. परंतु ती उत्पन्न झाल्यावर सुमारे दोनशे वर्षांच्या आंतच झणजे धर्मव्यवहारकत्यांस तिचें निजरूपाने निरुपयोगित्व दिसून येण्यापूर्वीच ते आले असावें. वराहमिहिराने त्यास कोठे वेदांग मटले नाही. तरी त्याचे वेळी तें वेदांग असलेच पाहिजे. ब्रह्मगुप्त (शके ५५० ) याणे एके ठिकाणी झटले आहे. युगमाहुः पंचाब्दं रविशशिनीः संहितांगकारा ये ॥ अधिमासावमरात्रस्फुटतिथ्यज्ञानतस्तदसत् ॥ २ ॥ व. सि. अ. ११. ह्यांतील अंगशब्द वेदांगज्योतिषास अनुलथूनच आहे असे दिसते. सांप्रत त्यास वेदांग मानितातच. वेदांगज्योतिषाच्या कक्पाठांत अशुद्धे केव्हां शिरली हे निश्चयाने सांगता येणार नाही. परंतु “पंचाशत्पलमाढकं" ही वराहमिहिरोक्ति आणि " चतुर्भिराढकैोणः" हा भटोत्पलकत उल्लेख यावरून त्यां च्या काळी (शके ४२७ आणि ८८८) अशुद्धे शिरली नव्हती असे दिसते. कापाठाच्या ३२ व्या श्लोकाचे उत्तरार्ध बृ. सं. अ. ८ यांतील उपांत्य श्लोकाच्या टीकेंत भटोत्पलाने घेतले आहे, ते माझ्याजवळील लेखी पुस्तकांत असें आहे. युगस्य पंचमस्येह कालज्ञानं निबोधत ।। यांत "पंचमस्य" हे अशुद्ध दिसते. तेथें “पंचवर्षस्य" असेंच पाहिजे. परंतु हल्ली वैदिकपाठ “निबोधत " याबद्दल “प्रचक्षते" असा आहे. यजुःपाठांतही “निबोधत" असे नाही. तर " निबोधत " असाच मूळचा भटोत्पलाचा शब्द असेल तर सांप्रत अगदी कायम झालेला वदिकपाठ शके ८८८ पर्यंत कायम झालेला नव्हता, असे दिसते. परंतु याबद्दल आणखी काही प्रमाणे मिळाल्याशिवाय हे अनुमान कायमचें ह्मणतां येत नाही. वराहमिहिर आणि भटोत्पल यांणी घेतलेली जी वाक्य पाठाच्या १७ व्या श्लोकांत आहेत त्यांच्याच अथांचा यजुःपाठाचा २४ वा श्लोक प्रधानपाठ. वर दिला आहे, तो शब्दरचनेनं अगदी भिन्न आहे. यावरून कपाठ जो हल्ली वैदिक म्हणतात तोच शुद्धरूपानें वराहमिहिर आणि भटोत्पल यांचे वेळी वैदिकांच्या पाठांत असावा, यजुःपाठ नसावा, असे दिसते. निदान पाठाचे त्यावेळी प्राधान्य तरी असावे. आर्यभटीयटीकाकार सूर्यदेवयज्वन याने वेदांगज्योतिषांतले दोन श्लोक अपपाठ.