पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वर्षाचे (१९ युगांचे) दिवस वास्तविक ३४७८७ होणार. किंवा वेदांगज्योतिषप्रमाण ३४७७० तरी होणारच. आणि पहिल्या माघ शुक्ल प्रतिपदेपासून इतक्या सानी ९६ व्या वर्षाची माघ शुक्ल प्रतिपदा होणार. तेव्हां ९५ वर्षांचे वास्तविक सारमानाने ३४६९८ दिवस असल्यामुळे वेदांगज्योतिषपद्धतीने ९६ व्या वर्षारंचाजी माघ शुक्ल प्रतिपदा तिच्या अगोदर उदगयन सुमारे ८९ दिवस किंवा निदान दवस तरी होईल. ह्मणजे सुमारे ३ किंवा २॥ चांद्रमासांचा फरक आला. वेदागज्योतिषपद्धतीने ९५ *वषांत ३८ अधिकमास येतात, ते ३५ धरले तर हा रिक पडणार नाही. असे न केले तर २०० वर्षांत ३ ऋतूंचा फरक पडेल. हा फारच आहे. इतक्या चुकीची पद्धति फार काळ सर्वत्र प्रचारांत असणे शक्य नाही. यावरून अस अनुमान निघाल्यावांचून रहात नाही की वेदांगज्योतिषपद्धति फार काळ सवत्र प्रचारांत नसावी. त्या पद्धतीने अधिकमास,क्षयतिथि आणि वृद्धिनक्षत्रं सर्वदा ताच तीच येतात हे वर सांगितलेच आहे. आणि अधिमास, क्षयतिथि, नक्षत्रवृद्धि, ह्या गोष्टी धर्मकृत्यांसंबंधे महत्वाच्या आहेत. अधिमास तर वेदांतही निंय मानलेला दिसतो. तेव्हां वेदांगज्योतिषपंचांग सर्वत्र किंवा बऱ्याच प्रदेशांत फार कालपर्यंत प्रचारांत असते, तर त्यांतील नियमित अधिमासादिकांचा सूत्रादि ग्रंथांत कांहीतरी उल्लख आल्यावांचून बहुधा राहिला नसता. यावरून देशाच्या काही भागांत मात्र काही वर्षे ती पद्धति प्रचारांत असावी असें अनुमान होते. दिनमानाची वृद्धि दिली आहे. ती सुमारे ३४ अक्षांशावरील स्थलांस लागू आहे. यावरूनही तसेंच दिसते. परंत यावरून इ० स० पूर्वी १४०० या सुमारास वेदांगज्योतिष झाले या ह्मणण्यास बाध येणार नाही. तैत्तिरीयश्रुतींत संवत्सरांची नांवें कोठे चार, कोठे पांच व कोठे सदा आली आहेत याचे कारण मला असे दिसते की, वेदांगज्योतिषांतील पंचसंवत्सरपद्धति त्यावेळी पूर्णपणे प्रचारांत आली नव्हती. पांच वर्षांनी चांद्रमासांच्या संबंधे पूर्ववत् अयनें होतात असा साधारण सुमार दिसून आला असेल, तेव्हां पांच संवत्सरांस नांवें पडली असतील. परंतु त्यांत फरक दिसून आल्यामुळे कधीं चार संवसरांचेंच युग मानले असेल, कधी सहाचे मानले असेल. काही दिवस नेहमीच्या प्रचारांत कोणतेच युग आलें नसेल. पुढे वर्षाचे दिवस ३६६ धरून पंचवर्षात्मक हिशेबास सोपे पडते, ह्मणून वेदांगज्योतिषकारानें तें प्रचारांत आणान पद्धति बांधली. परंतु ती पुढे लवकरच सोडून द्यावी लागली असे अगदीच सोडून न देतां अधिकमहिना योग्य स्थली घालून ह्मणजे सुमारें। ३८ अधिकमास न घालतां ३५मात्र घालून मेळ पाडून घेत आले असतील लोकांत बहुतेक धर्मकत्ये चांद्रमानावर चालत असल्यामुळे ते अनादिका नेहमी प्रचारांत आहे. आणि त्या पद्धतीने अधिकमहिना योग्य स्थली णजे सौरमासाशी त्याचा मेळ, ठेवितां येतो, ही मोठी सोय आहे. वेदकामपद्धति असावी असे माझे अनुमान पहिल्या विभागांत सांगितलेच आहे क्षत्री होत असलेले उदगयन बदलण्यास सुमारे १००० वर्षे पाहिजेत र

  • उदाहरणार्थ ९५ वर्षे घेण्याचे कारण वेदांगज्योतिषपद्धति आणि सांप्रती या दोहींप्रमाणे अधिमाससंख्या पूर्ण येईल अशी वर्षसंख्या ९५ हून कमी नाही. दांगज्योतिषपद्धतीने ३८ आणि सूक्ष्ममानाने सुमारे ३५ अधिमास येतात.

रांत आणून त्याची गली असेल किंवा णजे सुमारे ९५ वर्षांत असतील. आमच्या अनादिकालापासून प्रोग्य स्थली घातला ह्म पाहिजेत. अधिकमास सांप्रतची सूक्ष्मपद्धति कमी नाहीं. ९५ वर्षांत वे