पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. न्यायदर्शन. न्यायशास्त्राचा मुख्य व मूळ ग्रन्थ अक्षपाद किंवा गौतम या महर्षीनी प्रणीत केला आहे. त्यांच्या न्यायदर्शनाचे पांच अध्याय आहेत, प्रत्येक अध्यायांत दोन दोन भाग आहेत, त्यास आन्हिक असें नांव आहे. हा सूत्रात्मक ग्रन्थ आहे. नैयायिकांच्या मतें एकंदर सोळा पदार्थ आहेत. ह्या पदार्थाचे उद्देश, लक्षण, परीक्षादि केल्याने तत्त्वज्ञान प्राप्त होते. तत्त्वज्ञान संपादन झाल्यावर दुःखाचा नाश होऊन निश्रेयस ( सर्व दुःख नाश-मोक्ष ) प्राप्त होते. म्हणून न्यायशास्त्र शिकणे हे अगदी अवश्यक आहे. १ प्रमाण, २ प्रमेय, ३ संशय, ४ प्रयोजन, ५ दृष्टान्त, ६ सिद्धान्त, ७ अवयव, ८ तर्क, ९ निर्णय, १० वाद, ११ जल्प, १२ वितण्डा, १३ हेत्वाभास, १४ छल, १५ जाति, आणि १६ निग्रहस्थान. असे सोळा मुख्य पदार्थ आहेत. पहिल्या अध्यायाचे पहिल्या आन्हिकांत नऊ पदार्थांची लक्षणे सांगितली आहेत. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, आणि शब्द अशी चार प्रमाणे नैयायिक मानतात. ह्याची लक्षणेहि येथे दिली आहेत. त्याचप्रमाणे प्रमेये कोणती, त्यांची लक्षणे हेहि सांगितले आहे. संशय, प्रयोजन, दृष्टान्त सिद्धान्त, अवयव, तर्क आणि निर्णय ह्या पदार्थांच्या व्याख्या दिल्या आहेत. म्हणजे प्रमाण व प्रमेय यांची लक्षणे, न्यायाचें