पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उपांगे. सांगितले आहे. काही पुराणे मिश्र आहेत; म्हणजे त्यांत अनेक देवांची भाक्त, सामर्थ्य धगैरे, यांचे वर्णन असते. सर्व पुराणांस वेदांचा आधार आहे; वेदबाह्य अशा गोष्टी ह्यांत नाहीत, अशी सामान्य जनांची समजूत पूर्वीपासून झालेली आहे. ह्याचे कारण असे दिसते की, पुराणांतील बऱ्याचशा प्रमुख गोष्टी वेदांतील गोष्टींचा विस्तार करून सांगणाऱ्या आहेत. वैदिक आख्यायिकांच्या आधारानेच बऱ्याच पारीणिक कथा रचून त्यांचा विस्तार केलेला दिसतो. उदाहरणार्थ, वामन व वराह अवतार, वसिष्ठ व विश्वामित्र यांचा कलह, त्रिपुरासुराची कथा इत्यादि. शिवाय भक्ति ( ही एका प्रकारचे कर्मच होय ), आणि ज्ञान, त्यांचे वर्णन व त्यांची महती पदोपदी पुराणांत दिसून येते. ह्या दोन्ही मोक्षमार्गीस वदांत आधार सांपडतो, येवढेच नाही, तर उपनिषदांत त्यांचे प्रामुख्याने प्रतिपादन केलेले असते. अशा कारणांवरून पुराणें वेदतुल्यच आहेत, अशी बहुजनसमाजाची समजूत व्हावी, ह्यांत कांहीं विशेष चमत्कार नाही. पुराणांतील मुख्य मुख्य गोष्टी माहीत होण्यास सध्या पुष्कळ साधने आहेत. तेव्हां पुराणांविषयी अधिक प्रतिपादन येथे करण्याची अवश्यकता आहे असे वाटत नाही.