पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. असल्यामुळे त्यांची गणना निराळी केलेली नाही. सर्ग, प्रतिसर्ग (विश्वाची सृष्टि, स्थिति व लय) देव, ऋषि, सोम, सूर्य इत्यादिकांचा वंश, युगे व मन्वन्तरे आणि त्यांचे कालमान, एकाद्या वंशांतील पुरुषांचे अनुचरित, ही पांच प्रकरणे प्रत्येक पुराणांत आलेली असतात. सर्व पुराणांत त्यांची वर्णने सामान्यतः एकसारखीच आहेत. त्यांत विसंगतता दिसून येत नाही. म्हणून ही सर्व व्यासानीच केली आहेत अशी भाविक लोकांची कल्पना होणे, हे योग्यच आहे. वस्तुतः पुराणे एककालीन नसून त्यांचा कर्ता एकच पुरुष नव्हता, ही गोष्ट एक दोन पुराणे वाचून सहज लक्ष्यांत येण्यासारखी आहे. भक्तिमार्गाचे प्रतिपादन करून त्याचा प्रसार करणे, हे पुराणांचे प्रधान प्रयोजन आहे. दुष्टांचा नाश करून भक्तांचें तारण करण्याचे कामी देवाने काय काय पराक्रम केले, ह्याचे अनेक प्रकारांनी वर्णन करून मनुष्यास भक्तिमार्गास प्रवृत्त करून भक्तीच्या योगानें संसारांतील दुःखें कमी होतात, व सुख, स्वर्ग आणि मोक्ष ही प्राप्त होतात, अशी दृढभावना उत्पन्न करणे, हेच पुराणांचे मुख्य स्वरूप होय. धर्म, अर्थ, काम व मोक्ष, हे चार पुरुषार्थ साधण्याची आचार, भक्ति व ज्ञान ही प्रधान साधने असतात. हीच पुराणांत वर्णिलेली आहेत. म्हणून पुराण हे सर्व शास्त्रांत गणिलें आहे. ह्या अठरा पुराणांतील बरीचशी पुराणे शिवभक्तिपर आहेत. विष्णूची भक्ति करण्यास सांगणारी पुराणे त्यांहून कमी आहेत. आदिमाया शाक्त, हिचे पराक्रम, सामर्थ्य व वैभव एकाच पुराणांत