पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उपांगे. उपांगें. १ पुराणे, २ न्याय ( न्यायदर्शन व वैशेषिक दर्शन), ३ मीमांसा (पूर्व मांसा व उत्तर मीमांसा ), आणि ४ धर्मशास्त्र ( स्मृति व वेदनाण अशीं सांख्ययोगादि दर्शनें ), ही चार वेदांची उपांगें मानिली आहेत. .. पुराणें -पुराणांतील श्लोकसंख्या पूर्वी एक कोटी होती. ती व्यासमुनींनी संक्षिप्त करून एकंदर चार लक्ष ग्रन्थ केला आणि महापुराणांत तो संकलित केला. महापुराणें अठरा आहेत. त्यांची नांवें व श्लोकसंख्या येणेप्रमाणे:-१ ब्राह्मपुराण, ( ३०००० ), २ पद्म, ( ५५००० ), ३ विष्णु, ( २३०००), ४ शिव, (२४००० ), ५ भागवत (देवी) ( १८०००), ६ नारद, (२५०००), ७ मार्कंडेय, (९०००) ८ अग्नि, ( १६०००), ९ भविष्य, ( १४५००), १० ब्रह्मवैवर्त, ( १८०००), ११ लिंग, (११०००), १२ वराह, ( २४००० ), १३ स्कंद, (८११००), १४ वामन, (१०००० ), १५ कूर्म, (१८०००) १६ मत्स्य, ( १४०००), १७ गरुड, ( १९०००), आणि १८ वे ब्रह्माण्डपुराण. ( १२२००), ह्या पुराणांशिवाय उपपुराणे व अवान्तर दुसरी पुराणें अनेक आहेत. ती सर्व ह्या महापुराणांच्या आधारानेच रचलेली आहेत, अशी समजूत