पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. व काय परिणाम होतो, आणि वनस्पति, प्राणी, ऋतू , पर्जन्यवृष्टि, धान्यादिकांची वृद्धि, इत्यादिकांवर ग्रहांचे आधिपत्य असल्यामुळे त्यांच्या स्थितीत कसा फेरबदल होत असतो, ह्या गोष्टींचे विवेचन केले असते. पर्वकाली हिंदुस्थानांत ज्योतिषशास्त्रांत बरीच प्रगति झाली होती. परंतु मध्यंतरीं कित्येक वर्षे त्यांत खंड पडल्यामुळे त्याची चालना होण्याचे बंद झाले आणि ज्योतिष गणितांत अन्तर पडूं लागले आहे. ह्या गोष्टीकडे लोकांचे लक्ष्य जाऊन पाश्चिमात्य साधनांच्या साहाय्याने आपल्या शास्त्रांत सुधारणा होणे फार इष्ट आहे. वेदकालीं अठावीस नक्षत्रे, व सूर्यचंद्राच्या गति येवढ्यांचीच माहिती होती, असे दिसते. काही ठिकाणी पांचच ऋतूंची नांवें येतात. राशि, वार, महिने यांची नांवे आढळत नाहीत. चंद्राचा प्रकाश सूर्यापासूनच आहे, अशी त्या वेळच्या लोकांची समजूत होती, असें वेदांतील आख्यायिकेवरून दिसन येतें. तैत्तिरीय ब्राह्मणांत कृत्तिका नक्षत्रापासून नक्षत्रे मोजण्यास आरंभ केला आहे. कृत्तिकादि नक्षत्रावर अग्न्याधान केलें असतां काय फल प्राप्त होते, हेहि तेथे सांगितले आहे. फलज्योतिषावर लोकांचा भरंवसा वेदकाली होता असे यावरून दिसते. च्छन्दःपादौतु वेदस्य । हस्तौ कल्पोऽथ पठ्यते ।। ज्योतिषामयनं चक्षुनिरूक्तं श्रोत्रमुच्यते ॥ शिक्षा घ्राणं तु वेदस्य। मुखं व्याकरणं स्मृतम् ॥ तस्मात्सांगमधीत्यैव ब्रह्मलोके महीयते ।।