पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- ज्योतिष शास्त्र. किती जरूर होते हे खाली दिलेल्या दोनचार उताऱ्यांवरून चांगले लक्ष्यात येईल. वसन्ते ब्राह्मणोऽग्निमादधीत । ग्रीष्मे राजन्य आदधीत । शरदि वैश्यआदधीत (ते. बा.) फल्गुनीपूर्णमासे दीक्षेरन् ।" (तै. सं.७,४.८ ) कृत्तिकास्वग्निमादधीत. (ते. ब्रा. १, १, २, १). याप्रमाणे विशेष काली विशेष कृत्ये करावयाची असतात. ज्योतिषशास्त्र आदित्याने प्रणीत केले आहे. गर्गमुनिप्रणीत असा एक ज्योतिषावर ग्रन्थ आहे. ह्या शास्त्राचे प्रतिपादन करणारे असे बहुविध ग्रन्थ पुढे निर्माण झाले आहेत. वर सांगितलेली सहा शास्त्रे ही वेदांची अंगे आहेत, असें खुद्द शिक्षा ग्रन्यांतच सांगितले आहे हे पुढल्या श्लोकांवरून दिसून येईल. ज्योतिष शास्त्राची सामान्य जनांस बरीच माहिती असल्यामळे त्याविषयीं येथे विशेष लिहिण्याची जरूरी नाही.स्थलमानाने ज्योतिपाचे दोन भाग करतात. एक सिद्धान्त किंवा गणित ज्योतिष, व दुसरा भाग फलज्योतिष किंवा होराप्रश्न वगैरे. गणित ज्योतिषांत नक्षत्रांची स्थाने, ग्रहांची गति, त्यांचे परम्परांमध्ये अन्तर, अनियतपणे संचार करणारे धूमकेतु, दृश्यमान सर्यगतीमुळे दिवस, महिन व वर्षे कशी होतात, ग्रहणं, ग्रहांचे अस्तोदय इत्यादि अनेक गोष्टींचा विचार केला असतो. फलज्योतिषांत ग्रहांच्या विशिष्ट स्थानी असणाऱ्या स्थितीमुळे मनुष्यमात्राच्या आयुष्यक्रमावर कसा - - - - - --