पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. हानि होते. म्हणून प्रत्येक मंत्राच्या ह्या तिन्ही गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. यासाठी वैदिककर्म यथाविधि होण्याकरितां च्छन्दःशास्त्र शिकणे अवश्य आहे. वृत्तांवर अतिप्राचीन व उत्तम असा ग्रन्थ (छन्दोविवृति) पिंगल मुनीनी लिहिला आहे. हाच वेदांग होय. ह्यांत आठ अध्याय आहेत. वर सांगितलेली वैदिक किंवा अलौकिक सात वृत्ते, आणि त्यांचे अवान्तर भेद, यांचे निरूपण ह्या ग्रन्थाच्या शेवटच्या तीन अध्यायांत केले आहे. इतिहास, पुराणे, व इतर लौकिक पद्यग्रन्थ, यांत जी लौकिक वृत्ते, असतात त्यांचे वर्णन पहिल्या पांच अध्यायांत आहे. ज्योतिष शास्त्र. ज्याप्रमाणे च्छन्दःशास्त्राच्या ज्ञानाची अवश्यकता व प्रयोजन ही वैदिक कर्मास असतात, त्याप्रमाणेच ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असणे, अगदी अवश्य आहे. याचे प्रयोजन असें आहे, अमुक कमें, अमुककाली, व अमुक कालपर्यंत करावीत, असें वेदांत सांगितले असते. काही कर्मे वर्षभर करावयाची असतात. चातुर्मान्यहि असतात. विशेष ऋतूंत कांहीं कर्मे करावीत असें आहे. दर्श व पूर्णिमा ही केव्हां येणार हे ठाऊक असले पाहिजे. त्याचप्रमाणे नक्षत्रांचीहि माहिती हावी. ज्योतिषाचे ज्ञान असणें त्यावेळी