पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

च्छन्द शास्त्र. वेदांत हा शब्द निषेधार्थी आणि उपमाबोधक असतो, अशा रीतीने वेदांतील शब्दांचे विशेष अर्थाचें निर्वचन या ग्रन्थांत केले आहे. म्हणून यास निरूक्त असे म्हणतात, च्छन्दःशास्त्र. वेदांतील बहुतेक सर्व मंत्र च्छन्दोबद्ध किंवा पादबद्ध असतात, म्हणजे ते मंत्र वृत्तांत रचले असतात आणि त्याला चरण असतात. काही वैदिक विशिष्टकमीनुष्ठाने अमुक एक च्छन्दांत वर्णिलेल्या मंत्रांनीच करावीत, असे सांगितले असते. उदाहरणार्थ. तैत्तिरीय ब्राह्मणांत असा आदेश आहे की, ब्राह्मणांनी अग्न्यधिष्ठान गायित्री मंत्रानें करावें, राजन्यांनी त्रिष्टुभमंत्राने व वैश्यांनी जगतीवृत्तांतील मंत्रानें अग्नीचे आधान करावें." याप्रमाणे अनेक विशेष कर्मासंबंधाने अनेक निरनिराळी विशेष वृत्ते असावीत असें कल्पिलें आहे. वेदांत मुख्यतः सात वृत्ते येतात. १ गायित्री, २ उष्णिक्, ३ अनुष्टुप् , ४ बृहती, ५ पंक्ति, ६ त्रिष्टुप् आणि ७ जगती, अशी सात वैदिक वृत्ते आहेत. गायित्रीत २४ अक्षरे असतात. उष्णिक वृत्तांत . २८ अक्षरे असतात. अशारीतीने पुढल्या प्रत्येक वृत्ताची चार चार अक्षरं वाढत गेली आहेत. कोणत्याहि मंत्राचा ऋषि, देवता, आणि च्छन्द ही माहीत नसतां, जर तो मंत्र म्हटला, तर ते फार अपायकारक आहे, त्यापासून मोठी