पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. वावे आणि ज्ञानवृद्धि व कर्मवृद्धि, यांच्या मार्गास लागावें 'ब्रह्ममीमांसा' या नावाचे एक दर्शन आहे, हे आली. कडे वेदांताला जी भरती आली आहे, त्यावरून बऱ्याच लोकांस कळलें आहे. पण, पूर्वमीमांसा, हे काय प्रकरण आहे, याचें अल्पस्वल्प सुद्धां ज्ञान, गृहस्थांस राहोच, पण वेदशास्त्रसंपन्नापैकी सुद्धा फारच थोडे लोकांस असेल. सांख्यांनी कर्मावर व कर्मप्रवृत्तीवर जो हल्ला केला, त्याचा जबाब पूर्वमीमांसा देते आणि हल्ला मागे फिरविते. कर्म म्हणजे काय, तें कां करावें, वेदांतील वाक्यांची संगति कशी लावावी, इत्यादि विषयांचे ज्ञान पूर्वमीमांसेवरून झाले असतां वेदकालीन लोकांच्या ज्ञानाची कल्पना करितां येते. प्रस्तुत ग्रंथांत में एक अधिकरण सविस्तर दिले आहे, त्यावरून मी म्हणतों, याचा प्रत्यय येईल. वेदांतदर्शन सुप्रसिद्धच आहे. प्रो. लेले यांनी केवलाद्वैत, विशिष्टाद्वैत इत्यादिसंबंधाने में त्रोटक दिग्दर्शन केले आहे, त्यावरून प्लेटो-अरिस्टाटल; डेक्का-स्पायनोझा; कँट, हेगेल; इत्यादि सुप्रसिद्ध तत्त्वज्ञांची द्वयें स्मरणांत येतात; तसेंच ह्या निर्दिष्ट तत्त्वज्ञांहून अधिक ओजस्वी असें श्रीमच्छंकराचार्य-श्रीमद्रामानुज यांचे युग्म दृक्पथांत अवतीर्ण होते. या महानुभव महात्म्यांचे प्रासादिक ग्रंथ वाचणे व समजून घेणे म्हणजे 'अवघाचि संसार सुखाचा' करण्याच्या मार्गाला लागणे होय. अनेक विपत्तींचे निदालन करून व्यष्टि व समष्टि, यांचा उद्धार संपादावयाचा असेल, निष्काम कर्मोपासनेचे व केवल ज्ञानाचे बीज रुजवावयाचे