पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. गेल, तर या महात्म्यांची ओळख करून घेण्याशिवाय पहला नाही, असे कोणासहि स्पष्ट दिसेल. ही ओळख व्हावी, म्हणून ग्रंथांत या भाष्यकारांचा निर्देश करून त्यांच्या अति सोज्ज्वल विचारसरणीचे दिग्दर्शन प्रो. लेले यांनी केले आहे. केवल अद्वैतापूर्वीच चार्वाकादि नास्तिक मतांचा निर्देश ग्रंथांत प्रथमारंभी करणे अवश्य होते. पण मुख्य सिद्धांतांचा परिचय झाल्यानंतर तद्विरोधाचा आभास मात्र दाखविणारे पण वस्तुतः अद्वैतज्ञानमंदिराला काही अंशाने उपकारक होणारे नास्तिक मत अद्वैताच्या नंतर देण्याची योजना करण्यामध्ये प्रो. लेले यांनी विशेष चातुर्य दाखविले आहे. या चातुयांचा प्रत्यय काळजीपूर्वक ग्रंथ वाचिला असतां मात्र येणार आहे. असो, प्राचीन ज्ञानमंदिराची उभारणी कशी झाली होती, त्याची आखणी विस्तीर्ण आणि विस्तार्य कशी आहे, इत्यादिकांसंबंधी जाणीव उत्पन्न करण्याचे आणि ज्ञानविस्तार आणि निष्काभकर्मवि तार संपादण्याची प्रेरणा करणारं श्रेयस्कारी सुफल जर परमेश्वरी अनुग्रहाने प्राप्त झाले तर प्रो. लेले यांच्या दृढ आणि दीर्घ परिश्रमाचे सार्थक होईल, असे मला वाटते. परमेश्वर करो, आणि ज्ञानकर्माच्या साम्राज्यामध्ये राडून अज्ञानालसग्रस्त झालेला हिंदी व महाराष्ट्र-समाज ज्ञानकर्मक्षम होवो ! अशी त्या महायोजक परमेश्वराची प्रार्थना करून ही प्रस्तावना पुरी करितो. चिं. गं. भानु. - - - - - - - -