पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. सर्व दर्शनें यज्ञयागांत व्याप्त झालेल्या ऋत्विजांनी व यजमानांनी फावल्या वेळांत वेदप्रसादाने प्रकाशित केली आहेत. सांख्यांनी प्रकृतिशास्त्रांचा अभ्यास केला, तर योगाचार्य पतंजलीनी प्रकृतीच्या अंतरंगांत प्रवेश करून प्रकतीस स्ववश करून घेतले आहे, असे दिसते. शिवाय, सांख्ययोगादिदर्शनांचें क्षेत्र इतकें व्यापक आहे की बाह्य विश्वांत किंवा अंतर्विश्वांत कोणताहि नवीन शोध कोणत्याहि काली कोणीहि लाविला, तरी त्याचा अंतर्भाव वरील दोन दर्शनांत करितां येईल. ह्या शास्त्रांनी जी रूपरेखा आंखून ठेविली आहे, ती इतकी विस्तीर्ण आणि संग्राहक होण्यासारखी आहे की विश्वाच्या अंतिम उक्रांतीत सुद्धां ही रूपरेखा बदलण्याचे कारण पडणार नाही. मात्र आपणा जीवांचें एक पवित्र कर्तव्य आहे. कपिलपतंजलीत्यादिकांनी जो ज्ञानप्रदीप लावून ठेविला आहे, त्याच्या प्रकाशाचे ग्रहण सर्वथा करून ह्या ज्ञानसाह्याने आपणापैकी प्रत्येकाने हा प्रदीप दिनप्रतिदिनीं अधिक प्रकाशमान होईल, अशी आपली तपश्चर्या ठेवावयाची. 'यज्ञो दानं, तपः कर्म' ह्या कर्तव्यत्रयींतील .' तप ' हे कर्तव्य अत्यंत व्यापक आहे. आपण प्रामाणि क पद्धतीने तपोव्रत चालवून आपल्या पूर्वजांनी दिलेले ज्ञानभांडार आपणहि प्रयत्नपूर्वक वाढविलें, तरच आपण आपल्या पितृ-ऋणांतून मुक्त होऊ. अर्थात् हे ऋण काय व किती आहे, ह्याचे दिग्दर्शन प्रो. भाऊसाहेबांनी केले आहे. ते पाहून प्रत्येक वैदिकाभिमानी द्विजानें आपलें ज्ञानक्षेत्र ठर