पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

निरुक्त. . ७७ निरूक्त. निघंटु म्हणून जो शब्दकोश आहे, त्याचा अन्तर्भाव निरुक्त ह्या ग्रन्थांत होतो. ह दोन्ही ग्रन्थ यास्काचार्यांनी केले आहेत. अमरसिंहाचा अमरकोश, वैजयन्ती, हलायुध इत्यादि संस्कृतांतलि लौकिक शब्दांचे कोश पुष्कळ आहेत. परंतु ते वेदांगांत येत नाहीत. एकार्थवाचक अनेक पर्याय शब्द असतात. वेदांत येणाऱ्या असल्या शब्दांचा कोश निघण्ट्रंत दिला आहे. निघण्टूची तीन कांडे व पांच अध्याय आहेत. पहिल्या कांडास नैवटुक ' कांड म्हणतात. ह्यांत तीन अध्याय आहेत. १ पहिल्या अध्यायांत पृथ्वी इत्यादि महाभूतें, दिक् काल वगैरे द्रव्यांची नांवें सांगितली आहेत. दुसऱ्यांत, मनुष्य, त्याचे अवयव इत्यादि द्रव्यविषयांची नावे आहेत. तिसऱ्या अध्यायांत ह्या पृथ्वी मनुष्य इत्यादि विषयांचे गुणधर्माची वाचक अशी नावे दिली आहेत. २ दुसऱ्या कांडास नैगमकांड म्हणतात. कारण ह्या कांडास वेदवाक्यांचे अवतरण करते वेळी, वेदवाचक 'निगम , शब्द हा यास्कानी फार वेळां वापरला आहे. या कांडाचा अध्याय एकच आहे. तिसऱ्या कांडास देवताकांड ह्मणतात. ह्यांत एकच अध्याय आहे. या अध्यायांत सर्व देवतांची माहिती आहे. · अग्नि ' या शब्दापासून देवी उर्जाहुती येथपर्यंत ज्या देवता सांगितल्या आहेत त्या पृथ्वीवरच्या --