पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - प्रस्थानभेद. चवथे कारण ( लघु ). थोडक्या कालांत लवकर माहिती करून घेतली पाहिजे. कोणी म्हणतील 'आम्हीं प्रतिपदपाठ करून सर्व वेदांतील पदांचें ज्ञान करून घेऊ." ही गोष्ट अशक्य आहे. कारण, इंद्र प्रतिपदपाठ करीत होता त्यास बृहस्पतीसारखा गुरु होता. हजार दिव्य वर्षे अध्ययन चाललें, तरी त्याची समाप्ति झालीच नाही. आपण तर मनुष्ये, फार झाले तर शंभर वर्षे आयुष्य असेल. यासाठी व्याकरणाच्या द्वारे वेद लवकर शिकला पाहिजे. ५ असंदेह हे पांचवें कारण. कोणत्या शब्दाविषयी किंवा शब्दसमुदायाविषयी त्यांच्या अर्थादिकासंबंधाने मनांत शंका किंवा संशय असता कामा नये. असे असल्यास यथाविधि कर्म होणार नाही. उदाहरणाने ही गोष्ट स्पष्ट दिसून येईल. तैत्तिरीय संहितेतील एक ब्राह्मणवाक्य आपण घेऊ. "थूलपृषतीमाग्निवारुणीमानडाहीमालभेत " स्थूलपृषती इत्यादि अशा गाईचें आलंभन करावे. येथे स्थूल आहे पृषती जिची असा समास सोडवावयाचा, किंवा स्थूला आणि पृषती असा समास सोडवायाचा. या शंकेचे समाधान केवल स्वरावरून होणार नाही. असल्या समासांत अन्त्यपद उदात्त असले तर तो कर्मधारय समास होतो; पूर्व पदावर प्रकृति स्वर असला तर तो बहुव्रीहि होतो, हे ज्ञान व्याकरणानेच प्राप्त होते. म्हणून वैदिकानें वैयाकरणी झाले पाहिजे. - - -