पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. व्याकरण. आणि आख्यात असे दोनच पदांचे भेद आहेत, असे कित्येकांचे मत आहे. नाम, आख्यात, उपसर्ग, आणि निपात असे पदाचे चार भेद होतात, असें पतंजलिप्रभृतीचे म्हणणे आहे. कर्मप्रवचनीय हा पांचवा भेद करावा असे हेलाराजाचे मत आहे, परंतु ह्या कर्मप्रवचनीयांचा उपसर्गात अन्तर्भाव होतो, असे भाष्यकारांनी सिद्ध केले आहे, म्हणून सामान्यतः पदाचे ( शब्दांचे ) चारच भाग गणिले जातात. ब्याकरणाचा अभ्यास करणे अवश्य आहे याविषयी पुष्कळ कारणे आहेत. त्यांचे सविस्तर वर्णन पतंजलीनी महाभाप्यांत केले आहे. त्यांपैकी काही वर सांगितली आहेतच. भगवान बररू चीनी मुख्य पांच कारणे सांगितली आहेत, ती अशी “रक्षोहागमलध्वसंदेहाः” (१) पहिले कारण वेदांचे रक्षण (रक्षा) केले पाहिजे. लोप, आगम, वर्णविकार, इत्यादिकांचें ज्याला ज्ञान आहे, त्यालाच वेदाचा अर्थ बरोबर समजेल आणि त्याच्या हातून वेदांचे चांगले परिपालन होईल. म्हणून व्याकरण शिकलें पाहिजे. २ दुसरे कारण ( उह). तर्काने व तारतम्याने लिंग, विभक्ति, इत्यादिकांत भेद करून कर्मानुरूप मंत्रांचा प्रयोग केला पाहिजे. वेदांत प्रत्येक यज्ञकर्मास लागणारे सर्व मंत्र तयार करून ठेवलेले नसतात. हे ज्ञान व्याकरणानेच प्राप्त करून घेतले पाहिजे. ३ तिसरे कारण आगम, ब्राह्मणाने सांगवेदाध्ययन करावे, ही वेदाज्ञाच आहे, ४