पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४ प्रस्थान द.. अध्यायांत चार पाद असतात. असें बत्तीस पादांचे हैं पुस्तक आहे. ह्यांत सुमारे चार हजार सूत्रं आहेत, ( ३९९२ ). ह्या सूत्रांत वैदिक व लौकिक व्याकरणाचे सर्व नियम सांगितले आहेत. या सूत्रांवर कात्यायन मुनीनी वार्तिक लिहिले आहे, आणि ह्या वार्तिकावर भगवान् पतंजली मुनीनी महाभाष्य केले आहे. ह्या तीन ग्रंन्थांस वेदांग ह्मणतात. कौमारादि व्याकरणावरचे ग्रन्थ दुसरे अनेक आहेत, परंतु त्यांस वेदांग म्हणत नाहीत. ते लौकिक ग्रन्थ होत. तैत्तिरीय संहितेच्या सहाव्या काण्डाच्या चवथ्या प्रपाठकांतील सातव्या अनुवाकांतल्या तिसऱ्या मंत्रांत वाक् व्याकृत कशी झाली याविषयीं एक आख्यायिका आहे. समुद्राच्या कांठी उभे राहिले असतां, जसा ध्वनि ऐकू येतो, तशी किंवा प्रतिध्वनीसारखी पूर्वी वाणी होती. म्हणजे वाणीपासून अर्थबोध होत नसे. ती 'पराची' होती. देवांनी इंद्राची प्रार्थना केली की, इन्द्रा! ही वाक् आम्हांस व्याकृत करून दे. यावर इंद्राने वर मागितला. तो असा " वायूला व मला एका पात्रांत (ऐन्द्रवायव्यग्रह) सोम प्यावयाला द्या" त्याप्रमाणे देवांनी ऐन्द्रवायव्यग्रहांत सोम घालून इन्द्रास दिला. हा सोम पिऊन इन्द्र संतुष्ट झाला आणि वाचेच्यामध्ये शिरून तिला विभागली म्हणजे व्याकृत केली. ती व्याकृत झाल्यावर भाषेत, प्रकृति प्रत्यय, पद, वाक्य इत्यादि भेद झाले. नाम'