पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद ह्या सूत्रावरूनच कदाचित् मनुस्मृति पुढे मनूने केली असावी, असें पाश्चिमात्य विद्वानांचे मत असावे असे दिसते. याबद्दल विशेष आधार नाही. शुक्लयजुर्वेदाचें श्रौतसूत्र कात्यायनानीं केलें आहे. याचे २६ अध्याय आहेत. शतपथ ब्राह्मणाच्या अनुरोधाने हा ग्रंथ लिहिला आहे, परंतु २२-२४ अध्यायांत सामवेदीय कर्माविषयी विवेचन आहे. सामवेदाची ' मशक ' (आर्षेय ), ' लाट्यायन' आणि 'द्राह्मायण ' अशी तीन सूत्रे आहेत. मशक सूत्रांत फक्त सोमयागाच्या वेळी म्हणावयाचे स्तोत्रमंत्र दिले आहेत. लाट्यायन सूत्र हा कोथुमशाखेचे सर्वमान्य सूत्रग्रंथ आहे. तांड्य किंवा पंचविंश या ब्राह्मणाच्या आधारें है दोन्हीहि ग्रंथ लिहिले आहेत. सामवेदाची 'राणायनीय' नांवाची जी शाखा आहे तिचे द्राह्यायणसत्र आहे. सामवेदी ब्राह्मण ह्या देशांत आढळत नाहीत. अथर्ववेदाचे वैतानसूत्र हे गोपथ ब्राह्मणाच्या आधाराने लिहिले आहे, परंतु बरेच ठिकाणी कात्यायन सूत्राप्रमाणे यांत विवेचन आहे.