पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोष्टी सांगून त्या त्या कर्मास लागणारे मंत्र व ब्राह्मण सांगितली आहेत, ह्मणजे कर्माच्या अनुरोधाने मंत्र सांगितले आहेत. शांख्यायन सूत्रांचे अठरा भाग आहेत; त्यांतील शेवटचे दोन भाग कौषितकी आरण्यकास अनुसरून लिहिले आहेत. आश्वलायन सूत्र हे ऐतरेय ब्राह्मणांच्या आधारावर लिहिले आहे. त्याचे बारा भाग आहेत. राजसूय यज्ञाविषयी विशेष माहिती शांख्यायन सूत्रांत आहे. हे सूत्र गुजराथेंत व तिकडील देशांत प्रचलित असावं. आश्वलायन सूत्र दक्षिणत चाल आहे. कृष्णयजुर्वेदीय सूत्रं एकंदर सहा आहेत असे म्हणतात त्यांची नांवें येणेंप्रमाणे:---बौधायन, आपस्तंब, हिरण्यकेशी, भारद्वाज, (तैत्तिरीय शाखांची) मानवसूत्र (मैत्रायणी शाखेचे ) आणि वैखानस श्रौतसूत्र. हे कोणत्या शाखेचे आहे हे माहीत नाही. बौधायनसूत्र सर्वात प्राचीन आहे.त्याचे मागून आपस्तंब आणि आपस्तंबाच्या आधाराने लिहिलेलें हिरण्यकेशी ही तीन सूत्रे सुप्रसिद्ध आहेत. आपस्तम्ब सूत्राचे एकंदर २९ प्रश्न ( भाग, प्रपाठक ) आहेत. त्यांतील २४ भागांत श्रौतकर्म सांगितले आहे. बाकीचे भागांत गृह्य प्रकरणे आहेत. हिरण्यकेशी सूत्रांत पहिले १८ भाग श्रौतविषयक आहेत. बाकीच्या ११ भागांत गृह्य प्रकरणे दिली आहेत. यांचे २९ च भाग आहेत. मानवसूत्र हे फार जुनें असावे, याची भाषा ब्राह्मणासारखी आहे, व यांत आख्यायिका वगैरे काहीएक नसून केवळ प्रयोग सांगितले आहेत.