पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. कोणते मंत्र व ब्राह्मण कल्यावेत, त्यांचा क्रम कसा असावा, असा आदेश किंवा उपदेश ज्यांत असतो तें कल्पसूत्र होय. हौत्र प्रयोगाचे ( होत्याचे कामाचें ) प्रतिपादन आश्वलायन, शांख्यायन, इत्यादि मुनींनी आपल्या सूत्रांत करून ठेविलें आहे. ही आश्वलायनसूत्रं ऋग्वेदान्तर्गत आहेत. शांखायन सूत्रं ऋग्वेदासंबंधींच आहेत, परंतु ती आपल्या ह्या देशांत कोणी म्हणत नाहीत, यावरून ती उपलब्ध व प्रसृत नाहीत असे दिसते. __कृष्णयजुर्वेदाचे तैत्तिरीय शाखेचे तीन सूत्रकार सध्यां आहेत. त्यांची नांवें, बोधायन, आपस्तंब आणि सत्याषाढ, हिरण्यकेशी, कात्यायनानी व पारस्करांनी शुक्लयजुर्वेदाची सत्रं केली आहेत. ही सूत्रे अध्वर्यु ऋत्विजांचे कर्माविषयीं मुख्यत्वेकरून प्रतिपादन करितात. ' मुख्यत्वेकरून' असें म्हणावयाचे कारण असे आहे की, आपस्तंभादिकांच्या सूत्रांत फक्त श्रौतप्रयोगच सांगितले नाहीत. त्यांत गृह्य प्रकरणेही आहेत औद्गात्रप्रयोग ( उद्गाता ऋत्विजाचे) सामवेदास अनुसरून लिहिले आहेत. लाट्यायन द्राह्यायण इत्यादि मुनींनी ही कल्पसत्रे लिहिली आहेत. अथर्ववेदाची वैतानसूत्रं ' या नांवाची कल्पसूत्रे आहेत. शांखायन व आश्वलायन या दोन्ही सूत्रांत विषय व त्यांचा अनुकम बहुतेक सारखेच आहेत. संहिता किंवा ब्राह्मण यांच्या क्रमाप्रमाणे यांचा क्रम नाहीं; परंतु कोणकोणत्या यज्ञादि कांत कोणते मंत्र म्हणावयाचे वगैरे