पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कल्प. ज्ञान अवश्य आहे. म्हणून शिक्षा ग्रन्थाचा अभ्यास केला पाहिजे. याचे अकरा अध्याय आहेत. विषय प्रतिपादनावरून ह्याची पांच खंडे होतात. ती तैत्तिरीय शाखेच्या शिक्षापनिषदांत आरंभीच सांगितली आहेत. १ वर्ण, २ स्वर, ३ मात्रा, ४ बलं, ५ साम, ६ सन्तान, (संतान म्हणजे संहिता) याचा विचार व्याकरणांत होतो असें वर सांगितले आहेच. याप्रमाणे शिक्षेत पांच खंडे आहेत. शिक्षा ग्रन्थ सर्व वेदांस साधारण आहे, तथापि प्रत्येक वेदासंबधाने या विषयावर दुसन्या मुनींनी प्रातिशाख्ये लिहिली आहेत. कल्प. वेदकालाच्या आरंभी दर्शपूर्णमासाच्याच इष्टि होत्या, पुढे यज्ञ, याग, इष्टि इत्यादि कर्मे वाढत गेली, त्यामुळे त्यांस लागणान्या मंत्रादिकाची संख्या व प्रयोग हे ही वाढत गेले. ह्यास्तव निरनिराळे वेद झाले, हे पूर्वी सांगितलेच आहे. यज्ञात होता, अध्वर्यु व उद्गाता या ऋत्विजांची कामें फार असतात आणि त्यांस म्हणावाचे मंत्र, व त्यांनी करण्याची अनुष्ठाने हीहि पुष्कळ असतात. याकरितां कोणत्या यज्ञात के.णत मंत्र म्हगावेत, कोणतें अनुष्ठान कलें करावें, इत्यादि गेष्टीविषयी विशेष ज्ञान होण्याकरितां सवि. तर प्रयोग निर. निराळे करून ठेवणे अवश्य झालें. ज्या ग्रन्थांत ही माहिती दिली असते त्यांस कल्पसूत्रं म्हणतात. कोणत्या अनुष्ठानांत