पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. काढणे, मान हालवणे इत्यादि उच्चारणांतील दोष सांगन माधुर्य, अक्षराचा स्पष्टाचार, इत्यादि गुण सांगितले आहेत. याप्रमाणे वर्णोच्चाराविषयी माहिती शिक्षेत दिली आहे. संहिता किंवा संतान ( वाक्य ) ह्याविषयों व्याकरणांत सविस्तर विचार केला असतो, म्हणन यथें त्याचा विचार केला नाही. मंत्राचे वर्णाच्या उच्चारांत दोष झाला, तर ते वाग्वन यजमानाच्या डोक्यावर पडून त्याचा नाश होतो. ' इंद्रशत्रु ' ह्या शब्दाचा स्वर चुकल्यामुळे केवढा घात झाला, ह्या गोष्टीचा उल्लेख शिक्षा ग्रन्थांत केला आहे (१-५२). ही गोष्ट अशी आहे. त्वष्टयाचा मुलगा इन्द्राने मारल्यामुळे त्याला राग आला, म्हणून त्वष्ट याने यज्ञात इन्द्राला हविर्भाग दिला नाही. इन्द्र साहसाने त्वष्टयाच्या यज्ञशालेत शिरला, आणि त्याचा सोम तो प्यायला. त्वष्टयाला राग येऊन बाकी राहिलेल्या सोमाची आहुति त्याने स्वाहेन्द्रशत्रुर्वधस्व' असें म्हणून अग्नीत दिली. त्वष्टयाचे मनांत इन्द्राचा शत्रु ( मारणारा ) असा तूं वृद्धि पाव, असे म्हणावयाचे होते. यासाठी अन्त्यपद त्वरित पाहिजे होते. म्हणजे इन्द्रशत्रुर्वर्धम्व असें त्याने म्हटले पाहिजे होते, परंतु त्वष्टयानें — इन्द्रशत्रुः ' असा उच्चार केला. त्याबरोबर पूर्व पद स्वरित झाले आणि त्या शब्दाचा बहुव्रीहि समास झाला, त्यामुळे इन्द्राचा शत्रु असा अर्थ न होतां, इन्द्र आहे शत्रु ज्याचा असा अर्थ होऊन इंद्रानेच त्या त्वष्ट्याच्या पुत्रांस मारिलें. ह्यासाठी वर्णोच्चारणाचे विशेष - - -