पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदांगे-किंवा उपग्रन्थ. आहे. हा ग्रन्थ बराच अर्वाचीन असावा, असे दिसते. शिक्षेत वर्णोच्चार कसे करावेत ह्याविषयी नियम व माहिती दिली आहे. संस्कृत व प्राकृत मिळून वर्ण एकंदर ६३ किंवा ६४ आहेत असें स्वयंभूने सांगितले आहे. हेच शंभचे मत आहे. स्वर आणि व्यंजने मिळून वर्ण होतात. स्वर हे अनुदात्त, उदात्त किंवा स्वरित असतात. हा भेद त्यांच्या स्वरावर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे स्वर उच्चारण्यास जो काळ लागतो त्यावरून ते हस्व, दीर्घ, किंवा प्लुत होतात. यावरूनच त्या स्वरांत मात्रा किती आहेत, हे समजतें. हस्वांत एक मात्रा, दीर्घात दोन, आणि प्लुतांत तीन मात्रा असतात. मुंगुसाच्या ओरडण्यास जितका वेळ लागतो, ती अर्धी मात्रा; चाष पक्ष्याच्या शब्दाची एक मात्रा, कावळ्याच्या ' काव ' ' काव ' शब्दांत दोन मात्रा असतात, आणि मोराच्या ‘टाहो' स जो वेळ लागतो त्यांत तीन मात्रा असतात. उदात्तादि सप्तसुरांत बसवितां येतात. उदात्ताचा निषाद व गांधार; अनुदात्ताचा ऋषभ व धैवत; आणि स्वरिताचे षड्ज, मध्यम व पंचम; असे तीन सूर असतात. ऊर, कंठ, शिर, जिव्हामूळ, दंत, नासिका, ओठ, आणि तालू ही वर्णाची आठ स्थाने होत. अच ( स्वर ) हे अस्पृष्ट असतात. यण ( य, र, ल, व ) हे वर्ण ईषत्स्पृष्ट असतात. इत्यादि सांगून वर्णाचे निरनिराळे वर्ग येथे सांगितले आहेत. ह्यालाच प्रयत्न म्हणतात. भरभर, अडखळत, अस्पष्ट उच्चार करणे, रेंगाळणे, हेल